आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियामध्ये दोन बॉम्बस्फोट; दमास्कस शहरात 46 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
बैरुत - सिरियातील दमास्कस शहरातील दोन वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांत किमान ४६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना राजधानीत घडल्याने परिसर हादरला.  

बाब-अल-साघीर भागात शनिवारी रस्त्याच्या कडेला एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला पेटवून दिले. त्याच वेळी एक बस तेथून जात होती. बसमध्ये विविध देशांतील पर्यटकांचा समावेश होता, असा दावा सिरियातील मानवी हक्क संघटनेने केला आहे. बाबमुसल्ला भागात दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी स्फोटके पेरून ठेवली होती. दुसरीकडे इसिसच्या विरोधातील लढाई सुरू राहणार आहे. इसिसच्या ताब्यातील राका शहरावर पुन्हा कायद्याचे राज्य आणण्यास आमचे प्राधान्य आहे, असे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका चिनी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सिरियातील हिंसाचार अजुनही सुरुच आहे. 
 
अमेरिका-तुर्की एकत्र येतील : असाद  
अमेरिका आणि सिरिया दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सोबत आहेत, परंतु अद्याप ट्रम्प यांनी आैपचारिकरीत्या संभाषण केलेले नाही. अमेरिका व तुर्कीला रशिया एकत्र आणू शकेल, असा विश्वास असाद यांनी व्यक्त केला आहे. सिरियाच्या भूमीवर सरकारच्या परवानगीशिवाय येणाऱ्या परदेशी फौजांना घुसखोर मानले जाईल, असा इशारा असाद यांनी दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...