आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ वर्षांनी शब्दश: मिळाला नवा "चेहरा', जगातील सर्वात मोठे चेहरा प्रत्यारोपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेत जगातील सर्वात अवघड चेहरा प्रत्यारोपण (फेस ट्रान्सप्लांट) झाले आहे. आगीत जळालेला अग्निशमन दलाचा कर्मचारी पॅट्रिक हार्डिसनला दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा बसवण्यात आला. ऑगस्टमध्ये सायकलिंग करताना अपघातात मरण पावलेल्या २६ वर्षीय डेव्हिड रोडोबाॅग याचा चेहरा हार्डिसनवर बसवण्यात आला. ही शस्त्रक्रिया गेल्या ऑगस्टमध्ये न्यूयॉर्कच्या एनवाययू लँगोन मेडिकल सेंटरमध्ये झाली. त्यात कवटीपासून मानेपर्यंतच्या भागाला नव्याने आकार देण्यात आला. हार्डिसनचा चेहरा विद्रूप झाल्यानंतर त्याची मुलेही त्याला घाबरू लागली होती. दहा वर्षे सोबत केल्यानंतर पत्नीनेही काडीमोड घेतला. बँकेने दिवाळखोर घोषित केले.
१०० जणांनी केली २६ तास शस्त्रक्रिया
- डाॅ. एड्युआर्डो रॉड्रिग्ज यांनी डोनर डेव्हिडचा पूर्ण चेहरा, टाळू, कवटी व त्यावरील त्वचा, पेशी, नस आणि मांसपेशी आदी सर्व काढले.
- दुसऱ्या सर्जिकल टीमने पॅट्रिकच्या चेहऱ्यावरची त्वचा काढली. यानंतर डॉक्टरांनी त्यावर डेव्हिडचा चेहरा बसवत त्याला रक्तवाहिन्यांना जोडले.

चेहरा मिळाल्यानंतर...
डाेळ्यांच्या उघडझाप करणाऱ्या मांसपेशींचे प्रत्यारोपण क्लिष्ट होते. दात्याच्या या मांसपेशी पॅट्रिकशी जुळल्या. प्रत्यारोपणानंतर पॅट्रिकचे ओठ, कान गुलाबी दिसत होते. या अवयवांत रक्तपुरवठा व्यवस्थित सुरू झाल्याचे ते लक्षण होते. प्रत्यारोपणाच्या तीनच महिन्यांनंी पॅट्रिकला त्याची काम करता येऊ लागली आहेत.

असा जळाला चेहरा
पॅट्रिक मिसिसिपीतील सेनाटोबियाचा रहिवासी आहे. २००१ मध्ये तो आग लागलेल्या घरात शोध आणि बचावमोहिमेत होता. अचानक घराचे छत त्याच्यावर कोसळले. यात त्याचा संपूर्ण चेहरा, डोके, मान आणि धडाचा भाग जळाला. यामुळे त्याच्या पापण्या, कान, नाक, ओठ, भुवयाही जळाल्या.

- ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया १०० वर डॉक्टर, नर्स आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पार पाडली. सुमारे २६ तास प्रत्यारोपण प्रक्रिया चालली. डॉक्टरांनी थ्रीडी माॅडेलिंग तंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर केला.