आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसा-फेक न्यूज-पोर्नोग्राफीला चाप लावण्यासाठी फेसबुक करणार 3000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - फेसबुकवर, ‘फेक न्यूज’, हिंसा आणि रिव्हेंज-पोर्नोग्राफीसंदर्भातील कंटेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत. विशेष करून व्हिडिओचे प्रमाण खूप मोठे आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फेसबुकने ३००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवरील माहितीवर नियंत्रण ठेवून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकणे हेच या कर्मचाऱ्यांचे काम असणार आहे. हे सर्व कर्मचारी फेसबुकच्या कम्युनिटी ऑपरेशन्स टीमचा भाग असतील. यात आधीच ४,५०० कर्मचारी आहेत.  

यासंबंधित फेसबुकचे संस्थापक-सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून लोक स्वत:ला किंवा इतरांना जखमी करण्याबाबतचे व्हिडिओ अपलोड करत आहेत. असे युजर एकतर लाइव्ह व्हिडिओ करतात किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ टाकत असतात. हे योग्य नाही. सुरक्षित समाजासाठी आपल्याला तत्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे. अशी माहिती लवकरात लवकर पकडण्यासाठी आम्ही वेगळ्या टूल्सचा वापर करत आहोत.’
समाजामध्ये दुही निर्माण करणारी भाषणे तसेच लहान मुलांवरील अत्याचारासंबंधी माहिती तत्काळ काढण्यात येणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले. लाइव्ह व्हिडिओमध्ये कोणी स्वत:ला किंवा इतरांना जखमी करत असेल तर तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी सामाजिक समूह किंवा पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.   काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती, ज्यामध्ये एकाची हत्या दाखवण्यात आली होती. आणखी एका व्हिडिओमध्ये मुलाच्या हत्या करताना दाखवण्यात आले होते. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...