आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ महिन्यांनी पुनरागमन करणारी गतचॅम्पियन राउसी ४८ सेकंदांत चीत; तरीही चॅम्पियनपेक्षा १८ कोटी अधिक मिळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास- अमेरिकेची मिश्र मार्शल आर्टिस्ट रोंडा राउसीने प्रदीर्घ कालावधीनंतर अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये (यूएफसी) पुनरागमन केले. मात्र, ती रिंगमध्ये एक मिनिटसुद्धा टिकू शकली नाही. १३ महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या राउसीला विरोधी खेळाडू अमांडा न्यून्सने ४८ सेकंदांतच चीत केले. ब्राझिलियन मिश्र मार्शल आर्टिस्ट अमांडाने बेंटमवेट किताब जिंकला. या कमबॅक फाइटसाठी राउसीला चॅम्पियनपेक्षाही अधिक पैसे मिळाले हे विशेष. तिला २० कोटी रुपये, तर अमांडाला २ कोटी रुपये मिळाले. यूएफसीमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूलासुद्धा कमी पैसे मिळू शकतात. फाइटची बक्षीस रक्कम खेळाडू ठरवतो. मोठ्या खेळाडूला तो हरला तरीही अधिक पैसे मिळतात.
  
राउसीने आपली अखेरची फाइट नोव्हेंबर २०१५ मध्ये लढली होती. तेव्हा अमेरिकेच्या होली होमकडून तिचा पराभव झाला होता. तो राउसीच्या करिअरचा पहिला पराभव ठरला. त्या पराभवातून सावरण्यास तिला खूप वेळ लागला. विजय मिळवून रिंगमध्ये पुनरागमन करता यावे यासाठीच तिने अमांडासाठी फाइट केली होती. मात्र, असे होऊ शकले नाही. अमांडाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून बाजी मारली. तिचे सुरुवातीचे पंच इतके जोरदार होते की, राउसी यातून सावरूच शकली नाही. दुसरीकडे राउसी अपेक्षेविरुद्ध रक्षात्मक खेळ करत होती. रेफरी हर्ब डीनने बाऊट थांबवले तेव्हा राउसी आपल्या पायावर उभी होती, मात्र फाइटच्या स्थितीत नव्हती. 

अमांडाकडून पराभवानंतर ती आईसोबत रिंगबाहेर गेली. विजयानंतर अमांडाने रिंगमध्ये आपली मैत्रीण नीना अन्सारोफाला आलिंगन देऊन जल्लोष केला. यानंतर अमांडा आेरडून म्हणाली, “राउसीबाबत अधिक विचार करायची गरज नाही. ती यानंतर चित्रपटात अभिनय करू शकते. तिला विसरून जा. तिच्याकडे खूप पैसे आहेत. मी तिला हरवू शकते हे मला माहिती होते. मी सर्वोत्तम आहे.’ 
 
या पराभवामुळे आता राउसीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राउसीने आता जिमपासून दुर्लक्ष करून अभिनयावर लक्ष  केंद्रित केले पाहिजे, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...