आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये 5 वर्षांत 145 लाख नोकऱ्या मिळणार, ज्येष्ठांना नोकरी देण्याची मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये ज्येष्ठांना नोकरी देण्याची मोहीम सुरू झाली आहे. येथील सरकारी संस्था ’बिझनेस चॅम्पियन फॉर ओल्डर पीपल’ संस्थेने याची सुरुवात केली. संस्था कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याचे आवाहन सरकारी व खासगी कंपन्यांना करत आहे. यासोबत काम करणाऱ्या घटत्या युवांच्या संख्येमुळे ५० ते ६९ वयाच्या जास्तीत जास्त नागरिकांना नोकरी देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  

संस्थेचे प्रमुख अँडी ब्रिग्ज म्हणाले, येत्या पाच वर्षांत ब्रिटनमध्ये १४५ लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. जागा भरण्यासाठी देशात ७० लाख युवा आहेत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त राहतील. त्यामुळे आपणास ओल्ड वर्कफोर्स वाढवावा लागेल. २०२२ पर्यंत ५० पेक्षा जास्त वयाच्या १० लाख लोकांना नोकरीत सामावून घेणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ज्येष्ठांच्या आरोग्याचा विचार करून कामाचे वेळापत्रक लवचिक असावे अशीही कंपन्यांना विनंती करत आहोत. युवा व ज्येष्ठांच्या वर्कफोर्समधील अंतर भरून निघेल का, या प्रश्नावर ब्रिग्ज म्हणाले, कंपन्यांनी पन्नाशीवरील लोकांची प्रामाणिकपणे नियुक्ती केल्यास ते शक्य होईल.दरवर्षी नोकरभरतीमध्ये ठरावीक वाटा ज्येष्ठांसाठी असावा. अखेर कंपन्यांनी असे का करावे,या प्रश्नावर ब्रिग्ज म्हणाले, वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो. तुम्हाला फक्त त्यांच्या वेळेनुसार प्रशिक्षण द्यावे लागेल. बहुतांश लोक लवकर निवृत्त होऊ इच्छित नाहीत. त्यांना दीर्घकाळापर्यंत कौशल्य विकास व ज्ञानाची देवाणघेवाण करावी वाटते.  
 
२०३० पर्यंत १८% पेक्षा जास्त असेल ओल्ड वर्कफोर्स
आंतरराष्ट्रीय कामगार  संघटनेनुसार(आयएलओ), ज्येष्ठांना नोकरी देण्याचा ट्रेंड हळूहळू जगभर वाढेल.विशेषत: श्रीमंत देशात ताे आधी होईल.२०३० पर्यंत ५५ वयापेक्षा जास्त वयाचा वर्कफोर्स १८% पेक्षा जास्त वाढेल.
बातम्या आणखी आहेत...