आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जपानमध्ये पूरसंकट, 90 हजार नागरिकांना हलवण्याचे सरकारने दिले आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - जपान सरकारने सेंट्रल जपानमध्ये आलेल्या पुरामुळे 90 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा आदेश दिला आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये भूस्खलन झालेले आहे. आतापर्यंत एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

जपान मिटीऑरलॉजिकल एजन्सीने टोचिगी आणि इबाराकी प्रातासाठी अलर्ट जारी केला आहे. तसेच नॉर्थ टोकियोलाही लँडस्लाइड आणि फ्लडबाबत अलर्ट जारी केला आहे. मिटीऑरलॉजिस्ट टकुया देशिमारू यांनी सांगितले की, यापूर्वी एवढा पाऊस कधीही झाला नव्हता. त्यामुळे आगामी काळातही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सेंट्रल टोचिगीच्या काही भागांमध्ये सोमवारपासून आतापर्यंत दोन फूटापर्यंत पाऊस झाला आहे. अथॉरिटीने टोचिगीला 90 हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. तर 80 हजार नागरिकांना घरे सोडण्याचा सल्ला दिला आहे.

हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, किनूगावा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. टोचिगी प्रांताच्या कनुमा सिटीमध्ये एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता झालेली व्यक्ती एक महिला असून ती 60 वर्षाची आहे. तिच्या पतीला वाचवण्यात यश आले आहे. भूस्खलनात घर पडल्याने त्याखाली ती दबली गेली. तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जपानच्या पुराचे PHOTO