आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील फुलांची शेती, डोंगरी रहिवाशांच्या मेहनतीचे साैंदर्य!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या लुपिंग शहराजवळील ‘काेल फ्लाॅवर फील्ड’ अर्थातच फुलांच्या खाेऱ्याचा विशाल परिसर चीनमध्येच नव्हे, तर पूर्व चीनमध्येही लाेकप्रिय अाहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलपर्यंत या खाेऱ्याचा रंग फुलांमुळे बदलून जाताे अाणि सारे वातावरण साैंदर्याने भारून जाते. याच खाेऱ्यातून एक नदी वाहते, जिथे लाेक नाैकेतून सफरीचा अानंद घेत फुलांमुळे नटलेल्या खाेऱ्याचे साैंदर्य न्याहाळतात. याच खाेऱ्यालगत बिकाेऊ धरण असून तिथे वीजनिर्मिती केली जाते. काेल पाॅवर फील्डच्या जवळील डाेंगरी भागातील रहिवाशांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ अाहे. २० वर्षांपूर्वी हे खाेरे सुने पडलेले असायचे, परंतु गावकऱ्यांनी इथे फुलांची शेती सुरू केली त्यामुळे या खाेऱ्याचे रूपडे पालटले. अाता येथील रहिवाशांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ही फुलांची शेतीच ठरली अाहे. एकाच माेसमात साधारणपणे वर्षभराचे उत्पन्न शेतकऱ्यांना हाेते. 
 
-china.org.cn
बातम्या आणखी आहेत...