एबिंगडन - इंग्लंडमधील कंपनी टेन फोल्डने हे फ्लॅट पॅक्ड घर तयार केले आहे. १० मिनिटांत तयार होणाऱ्या या स्ट्रक्चरला घर, क्लासरूम किंवा बिझनेसच्या जागेच्या स्वरूपात वापरता येईल. कंपनीमध्ये तयार या घराची वाहतूक करणेही सोपे आहे.
या घराच्या एका युनिटवर सुमारे ८४ लाख रुपये खर्च होतात. या घराचे निर्माते डेव्हिड मार्टिन यांनी सांगितले की, “त्यांची मुले खूपच जास्त भाडे भरून लंडनमध्ये राहून शिक्षण घेत होती, त्यातूनच त्यांना परवडणाऱ्या घराची कल्पना सुचली.’ या प्रकल्पावर सात वर्षांत त्यांनी सुमारे ३३ कोटी रुपये खर्च केले. दक्षिण आफ्रिकेमधून कंपनीला अशा ३ हजार घरांची निर्मिती करण्याचा प्रकल्प मिळाला आहे. इंग्लंडव्यतिरिक्त पूर्ण युरोप, कॅनडा आणि चीनमध्ये या घरासाठी कंपनीने पेटंट मिळवले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, नैसर्गिक एनर्जीने राहतो प्रकाश आणि एकापेक्षा जास्त मजले...