आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक राजकारण्यांकडून फ्रान्सच्या तरुणांचा अपेक्षाभंग; मॅक्रो यांच्या विजयाने दाखवला नवा मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्सच्या लाखो तरुण मतदारांनाही कित्येक पिढ्यांपासून राज्य करत असलेल्या समाजवादी आणि अनुदारवादी पक्षांना झुगारून देऊन ३९ वर्षीय एमॅन्युअल मॅक्रो यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवून दिला. हे नव्या ट्रेंडचेच संकेत आहेत. मतदारांनाही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांऐवजी मॅक्रो, डाव्या संघटनांशी निगडित जीन लूक मेलेनकॉन आणि दक्षिणपंथीय नॅशनल फ्रंटच्या मेरीन ली पेन यांना प्राधान्य दिले. यात दोन कोटी, दहा लाखांहून अधिक मते मिळवून सर्वात तरुण मॅक्रो यांनी मुख्य स्पर्धक लीन पीन यांचे आव्हान दुबळे ठरवले. जुनी पद्धत इतिहासजमा झाली. मॅक्रोंच्या ३३ वर्षीय डिजिटल कोऑर्डिनेटर मूनिर महजौबी यांनी टाइमला सांगितले की, तरुण पिढी गेल्या २० वर्षातील राजकारणाला कंटाळली आहे.

फ्रान्सला क्रांती ही काही नवीन गोष्ट नाही. मॅक्रो यांना कडाडून विरोध होईल जेव्हा ते आपल्या निवडणुकीतील आश्वासनानुसार खर्च आणि करात कपात करण्यासाठी पावले उचलतील. त्यांना फार मोठे बहुमतही मिळालेले नाही. अनेक तटस्थ लोक त्यांना व्यवस्थेतील अपरिहार्यता मानतात. त्यांच्या नव्या ला रिपब्लिक अॅण्ड मार्शे पार्टीची पुढील महिन्यात होणाऱ्या संसदीय निवडणुकीत खरी परीक्षा असेल. 

 मॅक्रो फ्रान्ससाठी काय करू शकतील, याचे उत्तर ७ मे रोजी विजयाच्या दिवशी मिळाले. विजयी रॅलीत २८ देशांच्या युरोपीयन युनियनची (इयू) धून वाजवली गेली. इयू निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. ली पेन इशारा देत राहिल्या की नोकऱ्या बाहेर जातील. दहशतवादी फ्रान्समध्ये घुसतील. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे सीमा सील करणे आणि मुक्त व्यापार करार संपुष्टात आणण्याचे धोरण अधोरेखित केले. त्यामुळे युरोपाला अधिक मजबूत बनवण्याच्या मॅक्रो यांच्या तर्काला लोकांनी जास्त उचलून धरले. जागतिक मंचावर मॅक्रो एकदम नवखे आहेत. त्यामुळे मध्यममार्गी राजकारण्यांना ते आकर्षित करतील. 
 
मॅक्रो यांची जर्मन चॅन्सलर अंजेला मर्केल यांच्याशी चर्चा झाली आहे. माजी अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी निवडणूक जिंकताच मॅक्रो यांच्याशी चर्चा केली. त्यांचे समर्थन केले आणि म्हणाले, ते रोल मॉडेल होऊ शकतील. ट्रम्प यांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. ट्रम्प पॅरिस जलवायू परिवर्तन करारातून वेगळे होण्याचे संकेत देत आहेत.
बातम्या आणखी आहेत...