आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘असद सरकार ही प्राथमिकता नाही’ - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - सिरियामध्ये दहशतवादाशी लढा देताना फ्रान्सची भूमिका स्पष्ट असून बशर अल असद सरकारला पायउतार करणे हा प्राधान्याचा मुद्दा नाही. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी प्रथमच सिरियाविषयीचे फ्रेंच धोरण जाहीररीत्या मांडले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेदेखील या मुद्द्याला प्राधान्याने घेऊ नये. दहशतवाद्यांचा खात्मा हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. २०११ पासून सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्धचा मुद्दादेखील आंतरराष्ट्रीय रणनीतीमध्ये महत्त्वाचा राहील आहे. मात्र त्यामुळे स्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे मत इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी व्यक्त केले. स्थानिक राजकारण हा विषय बहुआयामी आहे.  
 
दहशतवादाच्या खात्म्यासाठी प्रत्येक देशाची मदत महत्त्वाची आहे. मुख्यत: रशियाची मदत तर महत्त्वपूर्ण आहेच. त्यामुळे हाच प्राधान्यक्रम आहे. सिरियाविषयी दुसरे प्राधान्य तेथील राजकीय स्थैर्याला आह, असे मुलाखतीत  मॅक्रोन यांनी सांगितले. 
 
बशर यांचा उत्तराधिकारी कोण ?  
बशर सरकारचा मुद्दा सर्व युरोपिय देशांनी वेळोवेळी मांडला आहे. यामध्ये मी छोटा बदल करू इच्छितो. बशर सरकार हटवले तर त्याला पर्यायी विधिवत सत्ता कोणाची असावी? ब्रिटनच्या गार्डीयनने, स्पेनच्या एल पाइस आणि जर्मनीच्या स्यूद्देस्चे त्झेतुंग वृत्तपत्राने मॅक्रोन यांची ही मुलाखत प्रकाशित केली आहे. दहशतवादी शत्रू आहेत. त्यांचा खात्मा करणे ही  फ्रान्सची प्राथमिकता आहे अशी स्पष्टोक्ती मॅक्राेन यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...