आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी संघटनांना निधी; तीन डझन खाती गोठवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- जागतिक आर्थिक दहशतवादविरोधी संस्थेच्या (एफएटीएफ) एका अहवालानुसार भारताने गेल्या काही वर्षांत सुमारे तीन डझन संशयित खाती गोठवली आहेत. दहशतवादी संघटनांना या खात्यांतून निधी पुरवला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून या खात्यांत एकूण सुमारे २.१२ कोटी रुपये होते.

जगभरात दहशतवादी संघटनांच्या कारवायांना अचानक आलेला ऊत पाहता एफएटीएफने (फायनान्शिएल अॅक्शन टास्क फोर्स) विविध देशांमध्ये अशा खात्यांचा आढावा घेतला. विशेषत: इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेने तर सिरिया-इराकसह आता पाश्चिमात्या राष्ट्रांतही उच्छाद मांडला आहे. या पार्श्वभूमीवर हा आढावा घेण्यात आला. भारत एफएटीएफचा पूर्णवेळ सदस्य असून यात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनसह अनेक बडे देश सदस्य आहेत. इस्लामिक स्टेटसारख्या संघटनेचा वाढत चाललेला धोका लक्षात घेऊन जागतिक पातळीवर काही खात्यांतून या संघटनेला पतपुरवठा होतो आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्यात आला. त्यानुसार काही ठराविक संशयित खात्यांची चौकशी करण्यात आली. त्यात आयएसच्या संबंधाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर विविध देशांनी अशा खात्यांवर केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला.

जी-२०चा पुढाकार : भारत सदस्य असलेल्या जी-२० राष्ट्रांच्या तुर्कीमध्ये पार पडलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी मुद्दा उपस्थित करून दहशतवाद्यांना होत असलेला आर्थिक पुरवठा तातडिने थांबवण्याची गरज प्रतिपादीत केली होती. त्यानुसार जी-२० राष्ट्रांनीही या कामी पुढाकार घेतला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काळ्या पैशाला अटकाव...