आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016 मध्ये अनेक देशांमध्ये कट्टरवाद्यांचे हल्ले वाढले; ठार झालेल्यांच्या संख्येत मात्र झाली घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सन २०१६ मध्ये कट्टरवाद्यांनी केलेल्या विविध हल्ल्यांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सुदैवाने घटली असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले अाहे. तथापि, कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक देश प्रभावित झाले असल्याची माहिती ग्लाेबल टेररिझम इंडेक्स (जीटीअाय)ने बुधवारी जाहीर केली.  


याबाबत अाॅस्ट्रेलियाच्या इन्स्टिट्यूट फाॅर इकाॅनाॅमिक्स अँड पीस या संस्थेने पुरवलेल्या माहितीनुसार गतवर्षी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत सुमारे २५,६७३ जणांचा मृत्यू झाला. ही अाकडेवारी दिलासादायक अाहे. कारण २०१४ मधील हल्ल्यांत ठार झालेल्यांच्या तुलनेत हे प्रमाण २२ टक्क्यांनी कमी अाहे. सिरिया, पाकिस्तान व अफगाणिस्तानातही अतिरेक्यांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांचे प्रमाण कमी झाल्याचे अाढळून अाले अाहे. तथापि, जगभरातील ७७ देशांना कमीत कमी एका माेठ्या दहशतवादी हल्ल्याचा अनुभव अाल्याचेही जीटीअायने अापल्या अहवालात म्हटले अाहे. जीटीअायकडे १७ वर्षांचा डाटा उपलब्ध अाहे. त्याच्या अाधारे ही बाब समाेर अाली अाहे. अशा प्रकारचा व्यापक डाटा अमेरिकेच्या मेरिलँड विद्यापीठानेही संकलित केला अाहे. नायजेरियातही बाेकाे हरमच्या दहशतवादी हल्ल्यांत ठार हाेणाऱ्यांचे प्रमाण ८० % कमी झाले अाहे. मात्र, इराकमध्ये २०१६ मध्ये इसिसच्या हल्ल्यांत प्राण गमावणाऱ्यांचे प्रमाण ४० % वाढले असल्याचे अाढळून अाले. डझनभरहून अधिक देशांना २०१५ मधील हल्ल्यांपेक्षा अधिक माेठ्या हल्ल्यांना २०१६ मध्ये सामाेरे जावे लागले अाहे. अफगाणिस्तानातही तालिबान्यांचे सामान्य नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले अाहे; परंतु त्यांनी तेथील सरकारविराेधात संघर्ष सुरू केला अाहे. जीटीअायनुसार युराेपसह अन्य विकसित देशांनाही १९८८ पासून २००१ पर्यंत भीषण दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला अाहे. इसिसच्या कारवायांसह दहशतवादामुळे संबंधित देशांत अनेक नागरिक मृत्युमुखी पडले अाहेत.  

दहशतवादी संघटनांनी हल्ल्यांची रणनीती बदलली  
इसिससारख्या दहशतवाद्यांनी अलीकडे हल्ल्यांची रणनीती बदलल्याचेही या अहवालातून दिसून अाले. अपारंपरिक पद्धत व सामान्य नागरिकांना सहज लक्ष्य करण्याएेवजी त्यांनी हल्ल्यांसाठी साेप्या व सहज पद्धती अंगीकारल्या अाहेत. इसिसची हल्ल्यांची क्षमतादेखील काहीशी कमी झाली असून २०१७ च्या प्रारंभीच्या काही महिन्यांत ठार झालेल्यांच्या घटलेल्या संख्येवरून हे स्पष्ट झाले अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...