आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन कार्डसाठी भारतीयांना बारा वर्षांची प्रतीक्षा यादी, 36 हजारांवर भारतीयांचा फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 वॉशिंग्टन  - अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीन कार्डसाठी भारतीयांना एक दोन नव्हे तर चक्क बारा वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण त्याची प्रक्रिया दीर्घ चालणार आहे. कुशल कर्मचाऱ्यांना ही प्रतीक्षा करावी लागणार आहे.  
 
अमेरिकेत दरवर्षी ग्रीन कार्ड मिळवणाऱ्यांत भारतीयांची संख्या अधिक आहे. कुशल कामगार म्हणून कायमस्वरूपी निवासाची परवानगी मागणाऱ्या भारतीयांना मात्र आता बारा वर्षांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सरकार २००५ मध्ये आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यात व्यग्र आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच इतर वर्षांचे ग्रीन कार्डसाठीच्या अर्जांचा विचार केला जाऊ शकेल. तोपर्यंत भारतीयांच्या हाती प्रतीक्षा करणे एवढेच हाती आहे.  
 
एच-१ बी व्हिसाधारकांची चांदी  : २०१० ते २०१४ मध्ये नोकरी करणाऱ्या २ लाख २२ हजारांवर भारतीयांना ग्रीन कार्ड मिळाले होते. हे प्रमाण ३६ टक्क्यांवर आहे. त्याचा सर्वाधिक लाभ एच-१ बी व्हिसाधारकांना मिळाला होता.
 
ग्रीन कार्डचे स्वरूप काय असते?  : स्थलांतरित व्यक्तीला अमेरिकेत कायमस्वरूपी नोकरी तसेच राहण्याची परवानगी देणारा हा एकप्रकारचा परवाना आहे. ग्रीन कार्डधारकांना पाच वर्षांनंतर अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज देखील करता येतो. अमेरिकी जोडीदार असल्यास हा कालावधी तीन वर्षे होऊ शकतो.  
 
३६ हजारांवर भारतीयांचा फायदा  
२०१५ मध्ये ३६ हजार ३१८ भारतीयांना कायमस्वरूपी निवासी म्हणून मान्यता मिळाली आहे. २७ हजार ७९८ भारतीयांना ग्रीन कार्ड मिळाले आहे. कुशल कामगारांच्या श्रेणीत भारतीयांना आता ग्रीन कार्डसाठी १२ वर्षांची प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...