आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाती युद्धाचे रणनीतिकार मॅकमास्टर नवे सुरक्षा सल्लागार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती युद्धाचे रणनीतिकार हर्बर्ट रेमण्ड मॅकमास्टर यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती केली आहे. ५४ वर्षीय मॅकमास्टर उच्च लष्करी अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल मायकल फ्लीन यांनी नियुक्तीच्या २४ व्या दिवशी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जाते.
 
ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांच्या ताफ्यात मॅकमास्टर यांच्याकडे सर्वात महत्त्वाची धुरा सोपवली जाणार आहे. ते व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रमुख राहतील. अमेरिकेत हे पद अत्यंत महत्वाचे मानले जाते. या पदावरील काही दिवसांपूर्वी फ्लीन यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी काही दिवसांतच पदाचा राजीनामा दिला. प्रचंड बुद्धिमान व अनुभव असलेला माणूस म्हणून मॅकमास्टर यांची आेळख आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याबद्दल वाचत होतो. त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात नितांत आदराची भावना आहे.
 
नवीन नियुक्तीमुळे सरकारच्या सन्मानात आणखी भर पडणार आहे, अशी भावना ट्रम्प यांनी मॅकमास्टर यांच्या नावाची घोषणा करताना व्यक्त केली. फ्लोरिडातील आपल्या निवासस्थानी त्यांनी मॅकमास्टर यांच्या नावाची घोषणा केली. मॅकमास्टर यांनीदेखील त्यास मंजुरी दिली. फ्लीन यांच्या राजीनाम्यानंतर रॉबर्ट हार्वर्ड यांची नियुक्ती झाली होती. परंतु त्यांनी हे पद नाकारले हाेते. त्यानंतर मॅकमास्टर यांचा नियुक्ती झाली.
 
अनेक देशांत तैनात
मॅकमास्टर अनेक आंतरराष्ट्रीय लष्कर मोहिमांत सक्रिय राहिलेले व लष्करी वर्तुळात दबदबा असलेले व्यक्तिमत्त्व आहे. जर्मनी, इराकमध्ये ते अमेरिकेच्या सैन्यात तैनात होते. २००७ मध्ये कमांडर जनरल डेव्हिड पेट्रॉयस यांचे ते विशेष सहायक होते. ट्रम्प यांच्या विरोधकांनी मॅकमास्टर यांच्या नियुक्तीला योग्य ठरवले. सिनेट लष्करी सेवा समितीचे प्रमुख व वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटर जॉन मॅकन यांनीही नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

व्हिएतनामच्या युद्धावर लिहिला प्रबंध
लष्कराचे लेफ्टनंट जनरल मॅकमास्टर यांचा २४ जुलै १९६२ रोजी जन्म झाला. ते अमेरिकेच्या इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहेत. व्हिएतनाम युद्धावर कडवी टीका झाली होती. त्यावर मॅकमास्टर यांनी प्रबंध लिहिला होता. त्यांना पीएचडी मिळाली होती.  व्हिएतनाममध्ये ३० वर्षे युद्ध केल्यानंतर अमेरिकी सैन्याला हात हलवत मायदेशी परतावे लागले होते. मॅकमास्टर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात १९९७ मधील डेझर्ट स्टॉर्मवर आधारित पुस्तक खूप गाजले. १९९१ च्या इराक युद्धात ते रणगाड्याच्या ताफ्याचे कॅप्टन होते.
 
बातम्या आणखी आहेत...