आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाच्या गावाहून जावे प्रेमाच्या देशा, जपानच्या कोफूकूमध्ये हॅपीनेस स्टेशनवर पर्यटकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाेकाइदाे (जपान)- जपान मध्ये एक असे रेल्वे स्थानक आहे जेथे लोक प्रवास करण्यासाठी नव्हे तर आनंद मिळवणे आणि प्रेम अनुभवण्यासाठी येतात. या स्टेशनचे नाव आहे ‘हॅपीनेस’. त्याच्या पुढचे स्टेशन अाहे ‘कंट्री ऑफ लव्ह’.

हा प्रवास ‘हॅपीनेस’पासून सुरू होते आणि ‘लव्ह’वर संपतो. ‘हॅपीनेस’स्टेशनच्या फाटकावर एक ‘लव्ह बेल’ बसवलेली आहे. ती वाजवून प्रत्येक प्रवासी आपल्या प्रेमासाठी दुवा मागतो. स्टेशन हॉलमध्ये युगुले आठवणीतील सुखद क्षण पोस्ट कार्डावर लिहितात. स्टेशनवर लव्ह बेंच बसवण्यात आलेले आहेत. येथे सर्वाधिक पर्यटक तैवानहून येत आहेत. कारण, तेथेही असेच रेल्वे स्टेशन आहे. ज्याचे नाव आहे ‘लव्ह’. त्याची कहाणी तैवानमध्ये मोठी प्रसिद्ध आहे. यामुळे जपान पर्यटन खात्यालाही मोठा फायदा होत आहे. दोन्ही देशांना ही नवी मैत्री वाढवण्याची इच्छा आहे.

जपानच्या होकाइदोच्या ओबिहिरो येथील कोफूकू (हॅपीनेस)आणि तैवानच्या हिझिंग (लव्ह) दरम्यान रेल्वे नसते. मात्र, एकाहून दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी तेथील लोकांची मने आसुसलेली असतात. जपानच्या राष्ट्रीय रेल्वेमार्गावर हिरो आणि ओबिहिरोच्या मध्ये कोफूकू स्टेशन आहे. ते १९५६ मध्ये उभारण्यात आले होते. त्याच्या पुढचे स्टेशन अइकोकूमध्ये आहे. त्याला ‘कंट्री ऑफ लव्ह’असे ओळखले जाते. १९८७ मध्ये हिरो रेल्वेमार्ग बंद करण्यात आला. यानंतर कोफूकू स्टेशन ओबिहिरो म्युनिसिपल गव्हर्नमेंटच्या हाती आले. १९७० च्या दशकात मोठ्या संख्येने लोक या स्टेशनवर येत असत.

त्याचे नाव ‘फ्राॅम कंट्री ऑफ लव्ह टू हॅपीनेस’ असे होते. मात्र, नंतर ते बंद पडले. २०१३ मध्ये सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्टेशन पुन्हा सुरू केले. २०१५च्या सहामाही आकडेवारीनुसार पर्यटकांत ९०.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५ मध्ये येथे ५४,७२७ पर्यटक आले होते.