किराणा दुकानात खरेदी करताना तुम्ही अपेक्षा करत असाल की, खरेदी करताना ऑलिव्हचे तेल हे ऑलिव्हचेच असेल. ऑर्गेनिक भाज्यांमध्ये विषारी रसायनांचा उपयोग झालेला नसेल आणि मसालेही शुद्धच असतील. पण तुमचा हा अंदाज चुकीचा ठगेल्या काही वर्षात खाद्यपदार्थात भेसळीचे प्रकार वाढलेले आहेत.
अमेरिकेतील खाद्यपदार्थात गडबड असल्याच्या काही नव्या प्रकारावर जरा नजर टाकूया. नैसर्गिक म्हणवण्यात येणाऱ्या मधामध्ये अँटिबॉयोटिक्स, जिऱ्यामध्ये शंेगाची पावडर आढळली आहे. इटालियन कंपन्यांच्या इटालियन ऑलिव्ह ऑईल या नावाने विकले जाणारे तेल हे इटलीचे नव्हते. असे पदार्थ आरोग्याला धोकादायक मानले जातात. उदाहरणार्थ ज्यांना शेंगांची अॅलर्जी आहे त्यांना भेसळयुक्त जिरा पावडर हानीकारक ठरू शकते. चीनमध्ये दुधाचे पेय पिल्याने सहा मुलांचा मृत्यू झाला. त्यात प्रोटीनची मात्रा वाढविण्यासाठी प्लास्टिक बनविण्यासाठी वापरले जाणारे मलामाईन हे रसायन घालण्यात आले होते.
अमेरिकेसह अन्य देशात अन्नपदार्थातील भेसळीच्या विरोधात कायदा आहे. पण अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनासह बहुतेक विभाग या कायद्याच्या अंमलबजावणीत अयशस्वी ठरले आहेत. सुरक्षा नियमांवर त्यांचा आधिक भर आहे. यादरम्यान सरकार आता जागे झाले आहे. २०१४ मध्ये ब्रिटनने खाद्यपदार्थातील भेसळीच्या विरोधात कारवाईसाठी फूड क्राइम विभाग तयार केला. बेलफास्टमध्ये ग्लोबल फूड सिक्युरिटी लॅब इन्स्टिट्यूट, लोकांनी पठविलेल्या नमुन्यांचे परीक्षण करते. ब्रिटन, अमेरिका, चीनसहित अनेक देशांनी भेसळयुक्त अन्न विकणाऱ्या कंपन्यांवरील दंडाची रक्कम वाढविली आहे.
३०० खाद्यपदार्थ निर्मात्यांच्या अधिकाऱ्यांचा समूह असलेल्या ग्लोबल फूड सेफ्टी इनिशिएटिव्ह यंदा आपल्या सदस्यांच्या पुरवठा साखळीचे ऑडिट करेल. कारगिलसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी असे प्रयत्न महत्त्वाचे वाटतात. सूर्यफूल तेलात भेसळ आढळताच तेलाच्या टाक्या सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिकडे अमेरिकन तज्ञांनी भेसळीच्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी फूड फ्राॅड इनिशिएटिव्ह या समितीची स्थापना केलेली आहे.
एलिस पार्क