आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथ समारंभाला हिलरी जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन या पती बिल क्लिंटन यांच्यासह उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जॉर्ज डब्ल्यू बुश सपत्नीक येणार आहेत. हा समारंभ २० जानेवारी रोजी होणार आहे.  ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही, असे पूर्वी म्हणणाऱ्या हिलरी यांनी नवीन भूमिका घेत घूमजाव केला.
 
वास्तविक बुश यांचे ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत. कारण रिपब्लिकनच्या प्रायमरीमध्ये बुश यांचे बंधू जेब बुश यांनी ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर (९२) यांनीदेखील समारंभाला हजेरी लावू, असे गेल्या महिन्यातच जाहीर केले होते. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या इलेक्टोरल कॉलेजची ३०६ मते मिळवत हिलरींचा पराभव केला होता. तेव्हापासून हिलरी सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होत्या. काही सामाजिक कार्यक्रमांचा अपवाद वगळता राजकीय कार्यक्रमात त्या दिसून आल्या नव्हत्या. दरम्यान, अमेरिकेतील ताज्या निवडणुकीत हिलरी यांचा पराभव झाला होता. परंतु निवडणूक प्रचाराच्या काळात दोन्ही गटांनी परस्परांवर चिखलफेक केली होती. त्यावरून कटुता निर्माण झाली होती. हिलरींनी समारंभास जाणार नसल्याचे म्हटले होते. 

११ जानेवारी रोजी पत्रकार परिषद  
डोनाल्ड ट्रम्प यांची ११ जानेवारी रोजी पत्रकार परिषद होणार आहे. वैयक्तिक उद्योग व व्हाइट हाऊस यांच्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष उद््भवणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली जाणार आहे, असे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. ट्रम्प यांनी जुलैपासून पत्रकार परिषद घेतली नव्हती. पत्रकार परिषदेत नेमका काेणता विषय मांडला जाणार आहे हे त्यांनी सांगितले नाही. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात जेम्स मॅटिस यांच्याकडे संरक्षण खाते, महसूल स्टीव्हन नुचिन, विल्बर रॉस वाणिज्य खाते सांभाळणार आहेत.  
 
 
बातम्या आणखी आहेत...