आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरी-ट्रम्प यांच्यातच अंतिम लढतीची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लीव्हलँड - अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातच मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. तिकिटाच्या दावेदारीसाठी दुसऱ्या सुपर ट्युसडेच्या निवडणुकीत हिलरींना चार राज्यांत विजय मिळाला, तर ट्रम्प तीन राज्यांत विजयी झाले. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात ट्रम्प हे विरोधकांच्या तुलनेत खूप पुढे निघून गेले आहेत. अध्यक्षपद निवडणूक या वर्षी आठ नोव्हेंबरला होईल. रिपब्लिकन पक्षात मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ट्रम्प हे फ्लोरिडातील सर्व ९९ प्रतिनिधींना आपल्या बाजूने करण्यात यशस्वी ठरले. त्यांना फ्लोरिडा, इलिनॉय आणि उत्तर कॅरोलिनामध्येही विजय मिळाला. ओहायोत मात्र गव्हर्नर जॉन केसिक यांनी त्यांना पराभूत केले. सिनेटर मार्को रुबिया यांनी फ्लोरिडा या गृह राज्यात पराभव झाल्याने अध्यक्षपद निवडणुकीतून माघार घेतली.
बातम्या आणखी आहेत...