आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथिओपियात हिंदी चित्रपटांच्या व्हिडिओ कॅसेट, सीडींची विक्री; 500 डॉलर घेऊन दुबईत पाऊल, आज 9 रेस्तराँची मालकीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - 21 वर्षांच्या सराह अरादी हातात 500 डाॅलर आणि डोळ्यांत काही स्वप्नं घेऊन इथिओपिया या आफ्रिकी देशातून दुबईत पोहोचल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. फक्त हाती होते इथिओपियात बनवले जाणारे भोजन तयार करण्याचे कौशल्य. त्यांचा मित्रपरिवार या कौशल्याची खूप स्तुती करत असे.  
 
सहा वर्षांच्या कठोर संघर्षानंतर त्यांनी दुबईत पहिले रेस्तराँ सुरू केले. ते खूप लहान होते, पण या छोट्याशा यशानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही; पण त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.  
 
१९९९ मध्ये सुरू केले पहिले रेस्तराँ, आतापर्यंत एकूण नऊ; म्हणजे दर दोन वर्षांनी उघडले एक रेस्तराँ  सराह सांगतात की, इथिओपियात त्या व्हिडिओ पार्लर चालवत होत्या. तेथे हिंदी चित्रपटांच्या व्हीएचएस (व्हिडिओ होम सिस्टिम) टेप घरोघरी पोहोचवत असत. ९० च्या सुरुवातीच्या काळात तेथे हिंदी चित्रपट अत्यंत लोकप्रिय होते.
 
इथिओपियातील भारतीय दूतावासातही त्यांच्याकडूनच व्हीएचएस टेप पोहोचवल्या जात; पण हळूहळू जेव्हा व्हीएचएस टेपचा कालखंड संपला तेव्हा त्यांनी सीडी, मोबाइल फोन आणि ब्रँडेड सनग्लासेसचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्या दुबईला गेल्या. दुबईत पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५०० डॉलर होते. दुबईत १९९३ ते १९९३ अशी सहा वर्षे त्यांनी संघर्ष केला.१९९९ मध्ये त्यांनी एक छोटे रेस्तराँ सुरू केले.  
 
त्याची लोकप्रियता वेगाने वाढू लागली. लवकरच त्यांनी दुबईतच दुसरे रेस्तराँ उघडले. त्यामुळे सराहचे उत्पन्न दरमहा १ लाख डिरहमपर्यंत पोहोचले. त्यानंतर सराहने मागे वळून पाहिले नाही. आज दुबई, शारजाह, अबू धाबी, रास अल खेमात त्यांचे ९ रेस्तराँ आहेत. तेथे इथिओपियाचे मूळ लोक त्यांचे निश्चित ग्राहक आहेत, पण स्थानिक लोकांतही या रेस्तराँचे जेवण खूप लोकप्रिय आहेत.   

एकट्या महिलेचा संघर्ष  
- ‘जेव्हा मी येथे आले होते, तेव्हा एकटीच होते. मी येथे शून्यातून सुरुवात केली होती. आज मी एका पूर्ण चेनची मालकीण आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही.
- सराह अरादी  
 
 
बातम्या आणखी आहेत...