आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडमध्ये आपले म्हणणे मांडण्याची मोठी परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९ व्या शतकातील कवी  पर्सी शैलीने कलाकारांना जगाचे अनधिकृत प्रतिनिधी म्हटले होते. त्यामुळे हॉलीवूडच्या फर्स्ट लेडी मेरिल स्ट्रीप यांनी नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळयात नूतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निर्भर्त्सना केली होती.  १९ ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या या अभिनेत्रीने आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि आवाजातील चढउताराच्या सहाय्याने शानदार भाषण केले.  लाखो लोकांनी तिचे हे भाषण लक्षपूर्वक ऐकले.  

तथापि ट्रम्प यांनीही यास तातडीने उत्तरही दिले आहे.  त्यांनी घोषणा केली की, स्ट्रीपला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व देण्यात आले आहे.  सोशल मीडियाच्या उत्साहपूर्ण वातावरणात एका अब्जाधीशाला प्रसिद्ध कलाकाराला अपमानित करणे म्हणजे अंधारात ग्रेनेड फेकल्याप्रमाणे ठरले.  प्रत्येकजण मैदानातच उतरला. ही स्थिती ट्रम्प यांच्यासाठी फायदेशीर ठरली.  स्ट्रीप हिच्या भाषणापूर्वी खरे मुद्दे बाातम्यांच्या गर्तेत होते.  आता अमेरिकन चित्रपट समीक्षक ट्रम्प यांच्या योग्यतेवर चर्चा करत आहेत. 

लोकप्रिय कलेचा राजकीय प्रभाव सरळ पडत नाही.  तो बोलण्यापेक्षा दिसण्यावर आधिक भर देतो.  एड्सच्या संकटावर टॉम हँक्सने भाषण नाही तर अभिनयाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते.  चित्रपटात विनोदाच्या अंगाने   टॉम जोड आणि  जेफरसन स्मिथ यांचेे सिद्धांत हेनरी फोंडा आणि जेम्स स्टीवर्ट यांच्या आयडियाच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरले.  अशा पद्धतीने मेरिल स्ट्रीप आपल्या भाषणाने, असा प्रभाव निर्माण करू शकली नाही ,जाे  सोफीज चॉइसमध्ये सोफीच्या पात्राने निर्माण केला आहे.  

हॉलिवूडमधील सर्वाधिक प्रभावी अभिनेत्यांमध्ये सामील असलेल्या  सिडनी पॉयटर हे लोकांचे अधिकार ताकदीने मांडत होते.  त्यांनी कृष्णवर्णीय आणि इतर लोकांसाठी आवाज उठविला.   २००२ मध्ये त्यांना ऑस्करचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.  पण त्यावेळी त्यांनी आपल्या  लेखक आणि दिग्दर्शकांचे आभार मानले होते.  पॉयटर म्हणाले, निर्मात्यांसमाेरच्या अडचणी समजतात.  तरीही कलेच्या माध्यमातून त्यांनी आपले म्हणणे चांगल्या पद्धतीने मांडले.  त्यांच्या प्रयत्नाने मला फायदा झाला.  धैर्य आणि विनम्रतेने कलेच्या माध्यमातून उठविलेला आवाज आधिक शक्तीशाली असतो. याचा अमेरिकेसह अनेकांना फायदाच झालेला आहे.  
 
हॉलीवूडसाठी कडवट धडा
मार्लन ब्रँडोच्या १९७३मध्ये  बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार हुकल्यानंतरही मूळ अमेरिकन्सच्या संघर्षाला योग्य स्थान मिळालेच नाही.  1978 मध्ये अभिनेत्री व कार्यकर्ती  वनीसा रेडग्रेवने जेव्हा यहुदीवाद आणि फॅसिझमविरोधात आवाज उठवूनही फायदा झाला नाही.  2012 मध्ये  रिपब्लिकन पक्षाच्या  राष्ट्रीय संमेलनात रिकाम्या खुर्चीवरून क्लिंट ईस्टवुढच्या अजब भाषणानेही  मिट रोमनीच्या बाजूने वातावरण तयार झाले नव्हते. 
 
डेविड वान ड्रेहले