अापल्या सादरीकरणापूर्वी जेसन बोर्ड खोलीच्या बाहेर लगबगीने येरझारा घालत होता. त्याचे तोड सुकले होते. गेल्या वेळी जेव्हा त्याने हा अनुभव घेतला होता तेव्हा तो स्वत:शी म्हणाला होता की, आरामात राहा, काहीही फरक पडणार नाही. यामुळे त्याने या वेळी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला आल्हाददायक असे वाटू लागले आणि बोर्ड रूममध्ये त्याचे सादरीकरण चांगले झाले.
ही कहाणी काल्पनिक वाटू शकते, पण यातही एक सच्चेपणा आहे. भावनांचे शास्त्र सांगते की, आमचे शरीर राग, उत्तेजना, आणि बेचैनीसह विभिन्न प्रकारच्या भावनांवर एकसारखीच प्रतिक्रिया देत असते. ताज्या पाहणीत असे आढळून आले आहे की, जर या लक्षणांकडे
आपण वेगळ्या पद्धतीने पाहिले तर परिस्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ जेव्हा आपण तणावात असतो तरीही आपण स्वत:ला रामांचित समजत असू तर तुम्हालाही तसाच अनुभव येईल. याचे कारण न्यूरोट्रान्समीटर आणि नोरपाइनफ्राइन हार्मोन आहेत. जेव्हा तुम्ही तणावग्रस्त आणि घाबरलेले असता तेव्हा नोरपाइनफ्राइनची पातळी प्रमाणापेक्षा वाढलेली असते. पण तुम्ही जर स्वत:ला उत्तेजित समजत असाल तर तुमची भावनाही तशीच हाेईल व हार्मोन्सचा स्तर खाली येईल. तणाव शिथिल करणे फार कठीण आहे कारण या दोन्ही स्थितीत लक्षणे फार वेगळी असतात. तरीही योग्य संदर्भाने तणाव किंवा ऊर्जा सकारात्मक ऊर्जा बनू शकते.
ब्राझीलच्या तुरुंगात का होतात हिंसक संघर्ष ?
तारा जॉन
या वर्षात उत्तर ब्राझीलच्या तुरुंगात चार हिंसक घटना घडल्या. त्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. गेल्या घटनेत ८ जानेवारीला चार जणांचा मृत्यू झाला. तुरुंगातील कैद्यांमध्ये संघर्ष आणि हिंसा भडकण्याची अनेक कारणे आहेत.
-कैद्यांची गर्दी : कैद्यांच्या संख्येसंदर्भात ब्राझील जगात चौथ्या क्रमांकावर आहे. जवळपास अर्धे कैदी विचाराधीन आहेत. जास्त संख्येमुळे त्यांच्यात गुन्हेगारांचे गट तयार झाले आहेत. अशांना वेगळे ठेवणे कठीण आहे. त्यांना वेगळे ठेवण्यासाठी कैद्यांना उत्तरेकडील राज्यातील तुरुंगात ठेवले जाते.
- अंतर्गत लढाई : अमली पदार्थाची तस्करी करणारे द फर्स्ट कॅपिटल कमांड आणि रेड कमांड यांच्यातील दंग्यामुळे स्थिती बिघडली. हातपाय तोडण्यापर्यंत मजल गेली आहे.
- कमी साधने : तुरुंगात साधनांची कमतरता आहे. १ जानेवारीला झालेल्या घटनेनंतर आधुनिक बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.