आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारी जिंकू नयेत म्हणून स्थायी सदस्यांची एकजूट; आयसीजे निवडणुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असणाऱ्या देशांनी आयसीजे निवडणुकीचा धसका घेत आता भारताचे उमेदवार दलवीर भंडारी जिंकू नयेत या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रिटनच्या उमेदवाराचा पराभव करत जर दलवीर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी आले तर भविष्यात आपल्या सत्तेला आव्हान मिळू शकते, अशी भीती स्थायी सदस्यांना आहे. 

 

या निवडणुकीच्या निरीक्षकांनीदेखील महासत्तांनी दलवीर भंडारींच्या विजयाचा धसका घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या निवडणुकीत दलवीर भंडारी यांच्याविरुद्ध ब्रिटनचे ख्रिस्टोफर ग्रीनवूड आहेत. हेग येथील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसवर महासत्तांना आपली व्यक्ती सर्वोच्चपदी हवी आहे. स्थायी सदस्य देश अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आता ग्रीनवूड यांच्या समर्थनार्थ एकजूट झाले आहेत. ब्रिटन हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा पाचवा स्थायी सदस्य देश आहे. या निवडणुकीच्या आतापर्यंत ११ फेऱ्या झाल्या आहेत. भंडारी यांना दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आहे. मात्र सर्वसाधारण सभेतील हे बहुमत असले तरीही सुरक्षा परिषदेत ते ग्रीनवूड यांच्यापेक्षा ३ मतांनी पिछाडीवर आहेत. 

 

या मतदानाची सोमवारी १२ वी फेरी होती. गेल्या शुक्रवारी ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह अनौपचारिक चर्चा केली. मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर ब्रिटन आपल्या अधिकारांचा वापर करत आयसीजे मतदान थांबवू शकतो. दोन तृतीयांश मताधिक्य मिळाल्याने सुरक्षा परिषदेच्या स्तरावर भारतीय उमेदवाराला रोखणे ब्रिटनला कठीण वाटत आहे.  लोकशाही पद्धतीने ५ स्थायी सदस्यांना आव्हान मिळू शकते. त्यांचा नकाराधिकार डावलून भारताचा विजय शक्य असल्याने आता महासत्तांवर तणाव आहे. 

 

गुप्त मतदान असल्याने संभ्रम 

आंतरराष्ट्रीय न्यायालयासाठीची निवड प्रक्रिया सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासभा दोन्हीसाठी गुप्त मतदान पद्धतीने होते. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे जाणून घेणे अशक्य आहे. आतापर्यंत सर्व टप्प्यांमध्ये सुरक्षा परिषदेत ग्रीनवूड यांना ९ आणि भंडारी यांना ५ मते मिळाली आहेत. यामध्ये वाढीची शक्यता पुढच्या टप्प्यात आहेच. भारत आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना आपली बाजू सांगत असल्याचेही म्हटले जात आहे. महासभेत बहुमत मिळाल्याने भंडारी यांना कौल द्यावा यासाठी सुरक्षा परिषद सदस्यांसमोर भारत सतत प्रयत्नशील आहे. यादरम्यान ब्रिटन सुरक्षा परिषदेमधील वर्चस्वाचा वापर करत पुढचे मतदान रोखण्याचा प्रयत्न करेल. संयुक्त संमेलन प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी ब्रिटन दबाव आणेल. असे वर्ष १९२१ मध्ये झाले होते.

बातम्या आणखी आहेत...