आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे चांद्रयान-1 चंद्राच्या कक्षेत कार्यरत, 2009 मध्ये हरवले ते सापडले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताच्या इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-१ सापडला आहे. इस्रोचा संपर्क तुटल्यानंतर हरवलेला चांद्रयान-१ चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत फिरत असल्याचा दावा नासाने केला आहे. नासाच्या शास्त्रज्ञांना ग्राउंड बेस्ड रडार तंत्रज्ञानाव्दारे चांद्रयान - १ चा ठावठिकाणा लागला.  
 
२९ ऑगस्ट २००९ रोजी चांद्रयान-१ शी इस्रोचा संपर्क तुटला. २२ ऑक्टोबर २००८ रोजी याचे प्रक्षेपण केल्यानंतर वर्षभरात शास्त्रज्ञांना संपर्क साधता येत नव्हता. नासाच्या जेट प्रोप्युल्शन लॅबोरेटरीला(जेपीएल) चांद्रयान - १ चा शोध लागला असून यान चंद्राच्या पृष्ठभागावरून साधारण २०० किमी भ्रमण करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...