आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तान यांच्‍या चर्चेतून काश्मीरप्रश्नी तोडगा निघेल, अमेरिकेला विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सीमेवर गोळीला गोळीने उत्तर देण्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत वादग्रस्त काश्मीर मुद्द्यावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास अमेरिकेने गुरुवारी व्यक्त केला आहे.

दोन्ही देशांच्या शांततामय प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. उभय देशांनी भौगोलिक किंवा अन्य कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. चर्चेची फेरी निश्चितपणे यशस्वी ठरेल. दोन्ही देशांत सध्या राजकीय पातळीवर चांगले संबंध आहे. व्हाइट हाऊसच्या सुरक्षा विभागाचे सल्लागार पीटर लॅव्हो यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियाशी संबंधित व्यवहाराचे वरिष्ठ अधिकारीदेखील आहेत. उभय देशांनी एकत्र यावे. बैठक आयोजित करावी. चर्चा करावी. त्यातून मार्ग काढावा. हे सर्व दोन्ही देशांनी ठरवायचे आहे. त्यात तिसऱ्या पक्षाचा संबंध नाही. भारत-पाकिस्तानने यापूर्वीच तसे स्पष्ट केलेले आहे. परंतु सध्या आम्ही आगामी एनएसएच्या बैठकीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहोत. सरहद्दीवर गोळीला गोळीने उत्तर देण्यापेक्षा त्यावर चर्चा करणे केव्हाही इष्ट आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचे भारताला पूर्ण अधिकार आहेत. ही चर्चेची प्रक्रिया आहे. ती सुरू झाली आहे. ही थेट स्वरूपाची आहे. असल्याने त्यातून नक्कीच चांगले काही निष्पन्न होऊ शकते, असा विश्वासही लॅव्हो यांनी व्यक्त केला आहे.
धोरणात बदल नाही, म्हणून सल्ला नाही
जम्मू -काश्मीर प्रदेश वादग्रस्त आहे. दोन्ही देशांतील हा मुद्दा आहे. तो दोघांनीच सोडवायचा आहे. ते तसे करतील. दोन्ही देशांतील हा सरहद्दीचा भाग आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करणे योग्य होणार नाही. याबाबत काही सल्ला देणे चुकीचे ठरेल. म्हणूनच यासंबंधीच्या आमच्या धोरणात काहीही बदल झालेला नाही, असे लॅव्हो यांनी सांगितले. फुटीरतावाद्यांना पाकिस्तानने चर्चेचे निमंत्रण दिल्यावरून बैठकीवर अनिश्चिततेची तलवार असल्याबद्दल विचारल्यानंतर लॅव्हो यांनी ही भूमिका मांडली.

लक्ष रविवारकडे
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सल्लागार पातळीवरील बैठक रविवारी २३ ऑगस्टला होऊ घातली आहे. गेल्या महिन्यात रशियात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी उभय नेत्यांनी एनएसएच्या बैठकीवर सहमती दर्शवली होती. आता सर्वांचेच या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
मुंबई हल्ल्याचा खटला चालवण्याची अपेक्षा
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारे पाकिस्तानमध्ये मोकाट फिरू लागले आहेत. त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये खटला चालवला जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. हा प्रश्न दोन्ही देशांतील आहे. दोन्ही देशांनी त्यावर अगोदरही चर्चा केली आहे. एनएसएच्या आगामी बैठकीत देखील त्यावर चर्चा करून मार्ग निघेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.