आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेरेसा सहा नोव्हेंबरला भारतात, पंतप्रधान झाल्यानंतरचा युरोपबाहेरचा पहिलाच दौरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सहा नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री लियाम फॉक्स आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळही येईल. थेरेसा यांनीच रविवारी ही माहिती दिली. त्यांचा हा युरोपबाहेरचा पहिलाच दौरा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून त्या येत आहेत. याआधी त्या २०१२ मध्ये ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून भारतात आल्या होत्या.
थेरेसा म्हणाल्या की, ‘दोन्ही देशांतील संबंध खूप मजबूत आहेत. आमच्या देशाच्या जीवनात भारतीय समुदायाची महत्त्वाची भूमिका आहे.’ थेरेसा यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांचे नेते संरक्षण सहकार्याबाबत चर्चाही करतील. थेरेसा म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेत मी द्विपक्षीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. त्यात नवी संपत्ती आणि नोकऱ्या निर्माण करणे, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य कायम ठेवण्याबाबत चर्चा होईल.’
पंतप्रधान मोदी यांच्याशी भेटीव्यतिरिक्त थेरेसा मे भारत-ब्रिटन तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन करतील. ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी तंत्रज्ञान परिषद आहे. यादरम्यान त्या भारत आणि ब्रिटनचे नेते, संशोधक आणि आंत्रप्रेन्योर यांची भेट घेतील आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा करतील.
रोजगार निर्मितीत भारत दुसरा मोठा देश
भारत सध्या ब्रिटनमध्ये नोकऱ्या निर्माण करणारा दुसरा मोठा देश आहे. गेल्या वर्षी भारताने १४० प्रकल्पांत ७,१०५ नोकऱ्या निर्माण केल्या. सध्या ब्रिटनमध्ये काम करत असलेल्या भारतीय कंपन्यात एक लाखापेक्षा जास्त काम करत आहेत.
‘ईयू’ सोडल्यानंतर भारतावर नजर
ब्रिटन पुढील वर्षाच्या सुरुवातीला युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार आहे. त्यानंतर त्या देशाला युरोपबाहेरील देशांच्या सहकार्याची गरज भासेल. त्यात भारत सर्वात मोठा सहकारी ठरू शकतो. थेरेसा मे म्हणाल्या की, युरोपियन युनियन सोडल्यानंतर आम्हाला आपल्या खंडाबाहेर नवी जागतिक भूमिका शोधावी लागेल. व्यापक जगासाठी आर्थिक आणि राजनयिक संधी शोधाव्या लागतील. मी व्यापारी उद्देशाने भारत दौऱ्यात या संधी शोधणार आहे.
बातम्या आणखी आहेत...