आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-अमेरिकेने मिळून हल्ले उधळून लावले, द्विपक्षीय भागीदारी ही आेबामा प्रशासनाची यशकथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारी हा राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या प्रशासनाची महान अशी यशकथा आहे. त्यांच्या कालखंडात दोन्ही देशांतील संबंध अधिक बळकट झाले आणि त्याचा उभय देशांना लाभदेखील झाला. त्या शिवाय उभय देशांनी मिळून अनेक दहशतवादी हल्ले उधळून लावले आहेत, असे राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पीटर लाव्हाॅय यांनी म्हटले आहे.  

भारत-अमेरिकेतील भागीदारी दृढ झाली आहे. संरक्षणासह विविध क्षेत्रांत दोन्ही देशांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. त्यामुळेच आेबामा प्रशासनाच्या महान अशा यशकथांपैकी एक म्हणून या भागीदारीकडे पाहिले पाहिजे. लाव्हॉय गेल्या अनेक दशकांपासून भारत-पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे आेबामा प्रशासनात दक्षिण आशियातील समस्या हाताळण्याची जबाबदारी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा कारभार सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्त्वाची मानली जाते.  
भारत-अमेरिका यांच्यातील संबंध भविष्यातही अतिशय चांगले राहतील. त्यात काहीही बदल होणार नाही. उलट ते आणखी दृढ होतील, असा विश्वास लाव्हॉय यांनी व्यक्त केला. आशियाच्या दृष्टीने अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याचा प्रयत्न होणेही गरजेचे आहे. दोन्ही देशांच्या आकांक्षांची या संबंधातून पूर्तता शक्य आहे. त्यामुळेच रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षांना या संबंधाचे नक्कीच महत्त्व आहे. 
 
आठ वर्षांपासून सहकार्य वृद्धी  
अमेरिका व भारत यांच्यात विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढले आहे. परंतु त्याची खरी सुरुवात आठ वर्षांपूर्वीच झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये दिलेल्या अमेरिका भेटीनंतर हे संबंध आणखी वरच्या पातळीवर पोहोचले. त्यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. आता दोन्ही देशांतील पूर्वीचे संकोच दूर झाले आहेत. त्यामुळे भागीदारीतील अडथळे दूर झाले. संवादातून नवा सेतू तयार झाला आहे, असे लाव्हॉय यांनी म्हटले आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...