आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाच्या अभियंत्याने तयार केले मिनी एफएम रेडिओ स्टेशनसारखे काम करू शकणारे पोस्टर्स आणि टी-शर्ट‌्सही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - एखाद्या शहरात मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच्या पोस्टरजवळून जाताना मोबाइलवर त्याचा मेसेज आला, त्याची तिकीट खरेदीही करता आली तर? होय, हे शक्य आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील भारतीय वंशाच्या एका अभियंत्याने ते शक्य करून दाखवले. 
या अभियंत्याने आपल्या चमूसोबत काही पोस्टर्स व टी-शर्ट््स तयार केले आहेत. यात अगदी सूक्ष्म असे अनेक रेडिओ ट्रान्समीटर लावण्यात आले आहेत. प्रथमच हे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. अभियंता विक्रम अय्यर यांनी सांगितले, ‘या तंत्रज्ञानाला बॅकस्केटरिंग ऑफ रेडिओ सिग्नल्स म्हणतात. हे ट्रान्समीटर्स रेडिओ लहरी कॅच करून त्यात बदल करतात. (संगीत जोडून) मग त्या लहरी (सिग्नल्स) प्रसारित होतात.’ विक्रम सांगतात, एका परिसरात कित्येक एफएम लहरी असतात. यातील फक्त उपयोगी ठरणाऱ्या लहरी प्रसारित केल्या जातात. म्हणजेच, मोठ्या एफएम चॅनल्सवर सुरू असलेल्या कामाच्या गोष्टी लोकांना सहज मिळू शकतील. हे मिनी रेडिओ स्टेशन्स २० मीटर किंवा थोडा कमी परिसरत कव्हर करू शकतात. प्रयोग म्हणून या अभियंत्यांनी एका संगीत कार्यक्रमाचे पोस्टर बस थांब्यावर लावले. याला कॉपर टेपपासून तयार केलेला अँटिना लावला. हे पोस्टर संगीत आणि त्यातील डेटा प्रसारित करत होते. ही प्रक्रिया पारंपरिक रेडिओ स्टेशनसारखीच होती. मात्र, यातील प्रसारित डेटा स्मार्टफोन व कारच्या स्टेरिओद्वारेही ऐकता येऊ शकतो. अशा स्टेशन्सना लागणारी वीजही अत्यल्प आहे.
 
अत्यावश्यक माहिती कोणत्याही परिस्थितीत...
प्राध्यापक श्याम गोलाकोटा यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा उद्देश स्मार्ट सिटीजच्या बाहेरील भागात पोस्टर्स असोत की रस्त्यावर लावलेले सूचना फलक असोत किंवा आपण टी-शर्ट घातला असेल तरी स्मार्टफोन आणि कारच्या स्टेरिओला याची माहिती पाठवून तुमच्याशी संवाद साधता येईल.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...