आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कस्तानात फुटबॉल स्टेडियम बाहेर कारमध्ये दोन बॉम्बस्फोट, 29 ठार 79 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तानबूल - तुर्कस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तानबूलमध्ये शनिवारी रात्री बेसिकतास फुटबॉल स्‍टेडि‍यमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. हे दोन्ही स्फोट एका कारमध्ये झाले. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

पोलिसांना केले लक्ष्य..
- तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान सोल्यो यांच्यामते पहिला स्फोट स्टेडियमबाहेर झाला. तर दुसरा स्फोट मक्का पार्कजवळ झाला.
- रिपोर्ट्सनुसार दोन फुटबॉल क्लबदरम्यानचा सामना संपल्याच्या दोन तासांनंतर हा स्फोट झाला.
- तुर्कस्तानातील ब्रॉडकास्टर एनटिव्हीच्या मते, स्फोटात पोलिसांच्या एका दंगलविरोधी व्हॅनला टार्गेट करण्यात आले होते. सर्व प्रेक्षक गेल्यानंतर ही व्हॅन परत चालली होती.
- स्फोटात मृत पावणाऱ्यांमध्ये बहुतांश पोलिसांचा समावेश आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने मीडियाला घटनास्थवळ जाण्यास मनाई केली आहे.
- सध्या पोलिसांनी ब्लास्ट झालेली जागा सील केली आहे. वॉटर कॅननच्या मदतीने कारमध्ये लागलेली आग विझवण्यात आली आहे.

राष्ट्रपतींने ट्वीटद्वारे केला निषेध..
- ब्लास्टनंतर तुर्कस्तानचे राष्ट्रपती सपीर अर्दोगन यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध केला. तसेच मृतांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
- तुर्कस्तानचे वाहतूक मंत्री अहमत अरसलन यांनी या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे.
- देशाला लक्ष्य करणारे कधीही जिंकू शकणार नाही, असे क्रीडामंत्री म्हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्फोटानंतरचे घटनास्थळाचे Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...