आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला वाचवण्यासाठी तो धावला, चोरांनी त्याचे सामान लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
न्यूयॉर्क - भारतवंशीय तरुण अनिल वन्नाविलीचे अमेरिकेत सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला कारण ठरले त्याचा धाडसीपणा. एका महिलेला रेल्वे गाडीखाली येण्यापासून त्याने वाचवले, परंतु महिलेला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेताच चोराने त्याच्या सामानावर डल्ला मारला.  

अनिल ३४ वर्षीय असून डेटा अॅडमिनिस्ट्रेटर आहेत. शुक्रवारी सकाळी मॅनहॅटनला जाण्यासाठी ते स्थानकावर गाडीची प्रतीक्षा करत होते. त्याचवेळी एडिसन स्थानकावर २६ वर्षीय माधुरी रेशरेला अचानक रुळावर कोसळली. अनिलने ते पाहिले आणि कसलाही विचार न करता त्याने माधुरीच्या दिशेने धावत तिचे प्राण वाचवले, परंतु तोपर्यंत प्रतीक्षा करत असलेल्या ठिकाणी त्याचे सामान कुणीतरी लांबवले होते. त्यात लॅपटॉप, हँडफोन, आेळखपत्र तसेच सोबतचे २०० डॉलरची रोकडही पळवली होती. आता पोलिस सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...