आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध मुलांना कराटेचे प्रशिक्षण, आतापर्यंत घडलेत शेकडो आंतरराष्ट्रीय खेळाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा - गाझा सिटीचे अल-मस्थाल क्लब. येथे आठवड्यातून दोन दिवस ७ ते १८ वर्षांपर्यंतच्या अनेक मुलांची गर्दी असते. हे अंध किंवा डोळ्यांनी अधू मुले या क्लबमध्ये कराटेचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. या १५ वर्षे जुन्या क्लबने आतापर्यंत अनेक पॅलेस्टिनी अंध मुलांना कराटेचे प्रशिक्षण दिले आहे. येथील शेकडो खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला आहे. 
गाझा आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे येथील जनजीवन सामान्य नाही. दिव्यांग पॅलेस्टिनी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांना कराटे शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. यामुळे ते आपल्या आतमध्ये दडलेल्या शक्तीला ओळखतात आणि मजबूत होतात. आता आमच्या क्लबमध्ये मुलींसुद्धा प्रशिक्षणासाठी येत आहेत. येथील काही मुले अंध तर काही अंशत: अंध आहेत. आम्ही वॉर्मअप घेऊन खेळाडूंच्या प्रशिक्षणाला सुरुवात करतो, असे येथील कोच हसन अल रे म्हणाले.
 
पुढील स्लाइडवर पाहा, संबधीत फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...