आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योगा दिनाची जगभर तयारी, ‘हट योगा’चे आकर्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरात तयारीला वेग आला आहे. वॉशिंग्टनमध्ये शनिवारी योगाचा सराव करण्यासाठी ऐतिहासिक नॅशनल मॉलमध्ये शेकडो योग साधक एकत्र आले होते. अमेरिकेच्या राजधानीत योगासाठी मोठ्या संख्येने लोक जमल्याचे पाहून खरोखरच आनंद वाटतो, असे राजदूत नवतेज सरना यांनी सांगितले.  
 
गेल्या तीन वर्षांपासून योगाच्या प्रचारासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी अमेरिकेत सुरू आहे. लोक उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या प्राचीन शास्त्र, तत्त्वज्ञान, साधनेला पुन्हा समोर आणले. त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. त्याच्या सरावातून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक निरोगी, समाधानी आयुष्य जगू शकतात, असे सरना म्हणाले.  
 
चीनमध्ये योगाची क्रेझ : चीनमध्येही योगाचा सराव सुरू झाला आहे. योगाचे जगातील सर्वात मोठे आयोजन करणारा भारतानंतरचा दुसरा देश म्हणून चीनची नोंद होईल. प्रसिद्ध ग्रेट वॉलच्या परिसरात योगाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात चीनच्या सरकारी यंत्रणेने देखील सहभाग घेतला आहे. युनान मिंझू विद्यापीठाने अनेक कार्यक्रमांच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. लहान-मोठ्या सर्वच शहरांत योग उत्सव साजरा केला जात असल्याचे पाहायला मिळू लागले आहे, अशी माहिती भारतीय योग तज्ज्ञ मनमोहन सिंह भंडारी यांनी दिली. मुख्य कार्यक्रम २० जून रोजी ग्रेट वॉल भागात होणार आहे. त्याशिवाय शांघाय, गाँगझूमधील वाणिज्यदूत कार्यालयात देखील योग दिन साजरा केला जाणार आहे.  
 
‘हट योगा’चे आकर्षण  
चीनमध्ये हट योगा हे साधकांचे आकर्षण राहणार आहे. त्यासाठी आयुष विभागाने २० योग दूतांची निवड केली असून त्यांना चीनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दहा तरुणी व दहा तरुणांचा समावेश आहे. हे योगदूत योगातील अत्याधुनिक तंत्राची सूक्ष्म माहिती साधकांना देतील.
बातम्या आणखी आहेत...