आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन भूतकाळ पुसण्यासाठी द्या हक्क, युरोपमध्ये चळवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- इंटरनेट आज आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. मात्र, नेटवरील भूतकाळ एखाद्यासाठी अडचणीचा ठरू शकतो का? होय. युरोपमध्ये या प्रश्नाने चर्चेला जन्म दिला आहे. ऑनलाइन भूतकाळ नेटवरून मिटवण्याची ‘राइट टू रिमूव्ह’ चळवळ ब्रिटनसह युरोपातील बहुतांश भागात वेगाने पसरत आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या इंटरनेट युजर्सना जुन्या पोस्ट डिलिट करण्याचा हक्क मिळावा, अशी ब्रिटिशांची मागणी आहे.
युरोपमध्ये लोक पाच वर्षांपासून ‘राइट टू फाॅर्गेटन’ हक्काचा वापर करत आहेत. ‘राइट टू रिमूव्ह’ हा त्याचाच विस्तार आहे. मात्र, या प्रस्तावावरूनही वाद सुरू झाला आहे. तुम्ही इंटरनेटवर अशा बटणाची कल्पना करत आहात जे तुमच्या यापूर्वीच्या सर्व ऑनलाइन घडामोडींना नेहमीसाठी डिलीट करून टाकेल.चळवळीची सुरुवात करणारे बॅरोनेट बीबन कीडरॉन म्हणाले, अल्पवयीन मुले १४-१५ व्या वर्षी केलेले काम (पोस्ट्स) योग्य नव्हते, या सामाजिक व िवकासात्मक बदलांच्या अनुभवातून जातात. इंटरनेटवर दीर्घ कालावधीपर्यंत झळकणाऱ्या या पोस्ट्समुळे त्यांना अनेकदा लाजिरवाण्या अनुभवांना सामोरे जावे लागते. त्यांच्यापासून सुटका करवून घेण्याचा सहजसाध्य मार्ग असला पाहिजे.
डिजिटल युगाचा बदल
या बाबतीत ऑक्सफोर्डचे प्राध्यापक आणि ‘डिलिट : द व्हर्चू आॅफ फॉर्गेटिंग इन द डिलिटल एज’ पुस्तकाचे लेखक व्हिक्टर मेयर स्कोनबर्गर म्हणतात, हा डिजिटल युगात होणारा एक महत्त्वाचा बदल आहे. इंटरनेटवर कायमस्वरुपी एक मेमरी तयार होऊन जाते, जी कधीही कुठेही पाहिली जाऊ शकते. ट्विटर व फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मिटवलेल्या पोस्ट्स पुन्हा ऑनलाइन सर्चमध्ये झळकू शकतात.
ब्रिटनमध्ये चळवळीचा प्रारंभ
ब्रिटनमध्ये नुकतीच याबाबत चळवळ सुरू झाली आहे. ‘आय राइट्स’ नावाच्या या मोिहमेची सुरुवात या विचारावर आधारित आहे की, स्वत: तयार केलेल्या डिजिटल कंटेंटला सहजपणे संपादित वा तो मिटवण्याचा अधिकार असायला हवा. चळवळीला ब्रिटनच्या इंटरनेट सुरक्षा प्रकरणांच्या मंत्र्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. आजच्या डिजिटल पिढीला सशक्त करणे हा चळवळीचा उद्देश आहे.
बातम्या आणखी आहेत...