आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणविरुद्ध नेतान्याहूंचे अमेरिकी ज्यूंना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका-इराण आण्विक करारानंतर नाराज असलेल्या इस्रायलने इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमाविरोधात अमेरिकेतील प्रभावशाली ज्यू समुदायास एकत्र करण्यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोहीम सुरू केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकाराने झालेल्या या कराराचे अमेरिकी लोकप्रतिनिधी गृहामध्ये पुन्हा परीक्षण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी हे आवाहन केले आहे.

या करारामुळे इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती क्षमतेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे नेतान्याहू यांचे म्हणणे आहे. याचबरोबर, इराणवरील निर्बंध शिथिल केल्याने पश्चिम आशियात अशांतता निर्माण करण्यासाठी इराण प्रचंड पैसा पुरवू शकेल, असा इशाराही नेत्यानाहू यांनी दिला. इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात अमेरिकेतील ज्यू समुदायामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे.
युद्ध नको म्हणून...
इराणशी झालेल्या या करारामुळे आगामी काळात आशियाच्या काही भागांत युद्ध पेटण्याचीच शक्यता अधिक असल्याने आपला या करारास विरोध असल्याचे नेतान्याहू म्हणाले. अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात १७ सप्टेंबर रोजी हा करार मांडला जाईल तेव्हा ज्यू लोकांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणावा म्हणून नेतान्याहू यांची ही खेळी असल्याचे मानले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...