आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये खाणीत स्फोट; 21 मजुरांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
तेहरान  - उत्तर इराणमधील एका कोळसा खाणीत स्फोट झाल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १४ बेपत्ता आहेत. या बेपत्ता मजुरांना शोधण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र, खाणीत सगळीकडे विषारी वायू पसरल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ते जिवंत असल्याची शक्यता आता जवळपास मावळली असल्याचा दावा बचाव पथकाच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे. या खाणीत ७० हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. 

गुलिस्ता प्रांताचे गव्हर्नर हसन सादेगलोऊ यांच्या मते, सुमारे १००० ते १५०० फूट खोल खाणीत एकावेळी ४० मजूर काम करत होते. दरम्यान, खाणीत अचानक स्फोट झाल्याने बाहेर उभे असलेले मजूर त्यांना वाचवण्यास आत गेले आणि तेसुद्धा मलब्याखाली गाडले गेले. इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी श्रम आणि कल्याण मंत्री अली रबी यांना मदतकार्याचा आढावा तसेच जखमींच्या उपचाराची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पाठवले आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...