आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या आयएसआयएसचा असा होईल खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसमधील हल्ल्यानंतर आयएसआयएसला संपवण्यासाठीचा विरोध अधिकच तीव्र झाला आहे. हे कसे शक्य होईल याविषयी टाइम नियतकालिक आणि द न्यूयॉर्क टाइम्समधील विशेष वृत्त भास्करच्या विशेष करारांतर्गत वाचा...

लष्करी कारवाईच्या पद्धतीवर चर्चा
आयएसला संपवण्यासाठी मध्य पूर्व भागात लष्कराचा उपयोग करायला हवा काय?
चर्चा का? कारण अमेरिकेसह अन्य अनेक देश आधीपासूनच इराक, सिरियात लष्करी कारवाई करत आहे.

आता काय?
लष्करी कारवाईसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक प्रस्ताव मंजूर करून आयएसला घेरावे लागेल. सध्या अमेरिका करत असलेल्या या कामात फ्रान्ससह अनेक राष्ट्रांचे सहकार्य मिळेल. यामुळे कायदेशीवर व राजकीय प्रभाव तयार होईल. ही प्रभावी पद्धत ठरेल.

सहकार्याचे फलित काय?
अमेरिका आयएसला एकट्याने आव्हान देण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे आयएसचा प्रभाव असलेल्या भागात हवाई, गुप्तचर आणि तार्किकतेत मदत व्हावी यासाठी फ्रान्स, रशियासारख्या देशांची अमेरिकेला नियोजनबद्ध मदत हवी आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, आणखी काय केल्यास आयएसआयएसचा होऊ शकतो खात्मा...