आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये तावी नदीला पूर, सलग तिसऱ्या दिवशी संपर्क तुटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिमवृष्टी तसेच पावसामुळे राज्याचा देशाशी संपर्क तुटला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या हिमवृष्टीमुळे महामार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. हा महामार्ग काश्मीर खोरे आणि उर्वरित देशाला जोडणारा एकमेव मार्ग आहे. तावी नदीला पूर आला आहे. 
 
जोरदार पावसाने दाणादाण
किश्तवार जिल्ह्यात घरावर झाड कोसळून पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. आगामी चोवीस तासांत जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात पुन्हा हिमवृष्टी होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. रविवारी कुपवाड्यात बर्फाचा ८ सेंटिमीटर थर आढळून आला. तापमान ०.१ अंश सेल्सियस होते. राजधानी श्रीनगरमध्ये तापमान उणे ०.७ सेल्सियस अंश नोंद झाली तर पाऊस ६१.६ मिमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरनाथ यात्रा मार्गावरील पहलगाम येथील छावणी परिसरात तापमान ०.२ सेल्सियस होते.
 
पुढील स्लाइडवर पाहा, जोरदार पावसाने दाणादाण केलेले पाणि...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...