आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-जपानचा चीनला इशारा : हिंदी महासागर ते प्रशांतपर्यंत कोणाची मनमानी चालणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग -  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानचे समकक्ष शिंजो अॅबे गुरुवारी शिखर बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर संयुक्त वक्तव्यात भारत-जपानने संयुक्तपणे काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता दोन्ही देश सामरिक व जागतिक भागीदारीमध्ये नवे शिखर गाठू शकतील. सागरी सुरक्षेत सहकार्य वाढवण्यासाठी हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्राला खुले ठेवण्याची जपानची रणनीती व पूर्व आशियाई देशांसोबतच्या मैत्रीला आणखी दृढ करण्याचे भारताचे धोरण असेल, हे स्पष्ट  झाले. हिंदी व प्रशांत महासागरात नियमानुसार व्यवस्था निश्चित करण्यासाठी उभय देश महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. सागरी क्षेत्राबाबत उभय देशांनी चीनला  या सागरी क्षेत्रात कोणालाही मनमानी करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा दिला. त्यावर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली.
 
अॅबे म्हणाले, पाकिस्तानने आपल्याकडील दहशतवाद्यांवर कारवाई करावी. दुसरीकडे दोन्ही देशांनी प्रादेशिक गटबाजीऐवजी भागीदारीबाबत चर्चा करायला हवी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आम्ही मोदी-अॅबे चर्चेच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करत आहोत. भारत-जपान यांचे संबंध प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी अनुकूल असतील, अशी आमची अपेक्षा आहे, असे चीनने म्हटले आहे.  

चिनी थिंकटँकच्या म्हणण्यानुसार : फ्रीडम कॉरिडॉरच्या माध्यमातून भारत-जपान यांनी चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणाला उत्तर दिले आहे. भारताने आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा हवाला देत आेबीआेआरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. भारत व जपानचा ‘फ्रीडम कॉरिडॉर’ प्रकल्प आशिया-प्रशांतपासून आफ्रिकेपर्यंत विस्तारलेला आहे. 
 
बुलेट ट्रेनमुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन, अर्थव्यवस्थेला गती मिळेल
जेव्हा मी बुलेट ट्रेनबद्दल बोललो तेव्हा लोक विचारत असत की मोदी बुलेट ट्रेन केव्हा आणणार? आता आणण्यास सुरुवात केली तर लोक विचारताहेत का आणणार? बुलेट ट्रेनमुळे मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळेल. रोजगार वाढेल. अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आगामी काळात शहरांचा विकास हायस्पीड कॉरिडॉरवर होईल.
- आमच्याकडे स्कोप आहे, तर जपानकडे स्किल आहे. जपानचे सहकार्य आणि कौशल्य विकासामुळे आपली ताकद हजार पट वाढेल.
 
अधिक किमतीमुळे ‘यूएस-२’ विमानांचा व्यवहार रखडला
भारत व जपानदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाला आहे, परंतु या दाैऱ्यात जपानकडून ‘यूएस-२’ समुद्री देखरेख विमानाचा व्यवहार हाेऊ शकला नाही. ७ वर्षांपासून चर्चा सुरू अाहे; परंतु अधिक किमतीमुळे हा व्यवहार हाेऊ शकलेला नाही. चर्चा सुरू असल्याचे दाेन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सांगितले.
 
अाता दाेन्ही देशांमध्ये पाचस्तरीय चर्चा हाेईल
संरक्षणाशी निगडित मुद्द्यांवर दाेन्ही देशांमध्ये पाचस्तरीय चर्चा करण्याचा निर्णय दाेन्ही देशांनी घेतला. त्यात भारत व जपानचे संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, संरक्षण व परराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी बैठक (टू-प्लस-टू), संरक्षण धाेरण संवाद व तिन्ही सैन्य दलांच्या स्तरावर हाेणाऱ्या चर्चेचा समावेश.
 
माेदींकडून निवडणूक बुलेट ट्रेन लाँच : काँग्रेस 
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशात दाेन-चार दिवसाअाड रेल्वे अपघात हाेत अाहेत. ते राेखण्यासाठी उपाययाेजना झाल्या पाहिजेत. मात्र, असे न करता गुजरातमधील निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून बुलेट ट्रेन लाँच केली अाहे. प्रत्येक राज्यात निवडणुकीपूर्वी माेदी माेठमाेठ्या याेजनांची घाेषणा करतात.
बातम्या आणखी आहेत...