आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूच्या युवकास फिरताना भेटली जपानी युवती, लग्न केले; 10 महिन्यांपासून हनिमून टूरवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बंगळुरू/ बार्सिलोना- बंगळुरूचा सुनील कौशिक व जपानची युका योकोजावा १० महिन्यांपासून हनिमून टूरवर आहेत. त्यांचा हनिमून आगळा-वेगळा आहे. दोघेही जगभर सायकलवर फिरत आहेत. फोल्डेबल सायकल, एक-एक बॅकपॅक आणि सोबत भारतीय मसाले व जपानी सॉस. आतापर्यंत थायलंड, लाओस, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, इराण, इटलीसह १३ देश ते फिरले आहेत. प्रवास २२ हजार किलोमीटरचा. 
 
या दौऱ्याला त्यांनी ‘सुशी अँड सांबर ऑन द सिल्क रूट’ असे नाव दिले आहे.
सुनीलने सांगितले, ‘ही माझी कल्पना होती. कारण प्रवासातच युकाची भेट झाली हाेती. हिमालयीन रांगांत मी सायकलिंगसाठी गेलो होतो. युका तेथे दलाई लामांच्या एका सभेसाठी आली होती. आम्ही मित्र झालो आणि तीन वर्षांपूर्वी लग्नही केले. आम्ही हैदराबादेत राहतो. माझी प्रवास योजना तिला सांगितली तेव्हा तिला गंमत वाटली. तिला सायकलही चालवता येत नव्हती. तिने सायकल शिकली.’
 
सुनील व युका आता बार्सिलोनात आहेत. तेथून पोर्तुगालला जातील. दोघांनी सांगितले, ‘हा दौरा एप्रिल २०१६ मध्ये सुरू झाला होता. हैदरादहून थायलंडला विमानाने आलो. तेथून सायकलिंग सुरू केली. आतापर्यंत सरासरी खर्च काढला तर रोज फक्त ३०० रुपये. आम्ही जातो तेथे छोटी कामे करून कमावतो. युका कधी शाळेत शिकवते, मी व्यवस्थापनाचे धडे देतो. कधी दोघे मिळून हॉटेलात शेफचे काम करतो.
 
 रात्री मुक्कामासाठी स्थानिक लोकांची मदत घेतो. काही मदत करतात, काही टाळतात. ज्यांच्या घरी आम्ही थांबतो तेथे पैशाऐवजी घरातील साफसफाई, स्वयंपाक करून त्यांचे आभार मानतो. आम्ही कपडेही सोबत ठेवत नाही. लोक देतात तेच कपडे घालतो. नंतर ते गरजूंना देऊन टाकतो. या प्रवासात कधी कधी आमच्याकडे खाण्यासाठी एकच ब्रेड असतो. आम्ही तोच वाटून खातो. कधी भांडणही होते. पण काही क्षणांत जुळवून घेतो. कुठे जायचे, याच मुद्द्यावर भांडण असते.’
किर्गिस्तानमध्ये अधिकारी म्हणाला...

अगोदर माझ्यासाेबत मिथुनच्या जिमी-जिमी गाण्यावर डान्स करा, तरच प्रवेश देऊ
सुनील सांगतो, ‘व्हिसा अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. किर्गिस्तानमध्ये एका अधिकाऱ्याने आम्हाला विचारले, तुम्ही भारतातून आलात. मिथुन चक्रवर्तीला ओळखता? अगोदर त्याच्या जिमी-जिमी गाण्यावर डान्स करा. तरच आमच्या देशात प्रवेश देऊ. गंमत म्हणून तो अधिकारी म्हणाला होता. तरी आम्ही या गाण्यावर डान्स केला.’

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नवदाम्पत्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...