आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद मुद्यावर भारताने केला सवाल, तालिबानी नेत्याला अतिरेकी घोषित का केले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुरुवारी भारताने दहशतवादाच्या मुद्यावरून सुरक्षा परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाकिस्तानवर परस्पर हल्ला चढवताना भारतीय प्रतिनिधीने म्हटले की, तालिबानी नेत्यास सुरक्षा परिषद दहशतवादी घोषित का करत नाही. यामागे कोणते रहस्य दडले आहे. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानातील शांततेच्या मुद्यावर चर्चा सुरू होती.

संयुक्त राष्ट्र संघात भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचे षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांच्या आजूबाजूला सुरक्षित ठिकाणे मिळायला नको. ते म्हणाले की, अमेरिकी ड्रोनने तालिबानी नेता मुल्ला मंसूरला पाकिस्तानात मारून पाडले होते. मे महिन्यामध्ये तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा यास नवीन नेता बनवले, ज्यास सुरक्षा परिषदेने आजपर्यंत दहशतवादी घोषित केलेले नाही. त्यांनी सांगितले की, ‘हे रहस्यच आहे की, एखाद्या दहशतवादी संघटनेचा नेता दहशतवादी घोषित नाही. का आम्ही हे रहस्य जाणू शकतो?’ भारतीय प्रतिनिधीने विचारले, ‘या मागे असा विचार असून शकतो की, प्रतिबंधित संघटनेच्या नेत्याला त्याच्या समूहाच्या कृत्यांना जबाबदार ठरवले जाणार नाही? अाता आम्ही याप्रमाणेच अांतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांती धोक्यात आणू पाहणाऱ्या सर्वात गंभीर धोक्यांपैकी एका धोक्याला सामोरे जाण्याचे ध्येय ठेवते?’ ते म्हणाले की, भारताचे प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या प्रतिबंध व्यवस्थेच्या कानावर पडतील. यावर काही उत्तर मिळेल िकंवा नाही. १९८८ मध्येही असेच झाले होते, तेव्हाची उत्तरेही आजपर्यंत मिळालेली नाहीत. त्यामुळे भारताने संयुक्त राष्ट्रसंघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अजहर मसूदलाही केले नाही दहशतवादी घोषित
बातम्या आणखी आहेत...