आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मत: हात नसलेली पहिली पायलट; घोड्यावर रपेट, पोहण्यासोबतच तायक्वांदोमध्येही ब्लॅक बेल्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- ती अगदी सहजपणे विमान चालवते, घोडेस्वारी हा तिचा छंद आिण जलतरणातही तेवढीच तरबेज. एवढ्यावरच तिचे यश थांबत नाही. तायक्वांदोमध्येही तिने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. जिला हातच नाहीत अशी एखादी व्यक्ती हे सगळे करू शकेल? कदाचित प्रत्येकाचे उत्तर यावर नकारात्मक असेल. परंतु अमेरिकेतील मिनसोटा प्रांतातील जेसिका कॉक्स या ३२ वर्षीय तरुणीने हे सहज साध्य केले आहे.

आज जेसिका जगातील हात नसलेली पहिली पायलट आहे. तिच्यावर तयार करण्यात आलेल्या ‘राइट फुटेड’ या माहितीपटाचा प्रीमियर नुकताच अमेरिकेत झाला. जेसिकाला पियानोचीही तेवढीच आवड आहे. जिम्नॅस्टिक, सर्फिंगसारखा धाडसी खेळही तिला आवडतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जेसिका कॉक्स
बातम्या आणखी आहेत...