आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी राग : काश्मीरदिनी पीआेकेमध्ये पाक विरोधी जोरदार घोषणाबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - काश्मीरदिनी पाकिस्तानने पुन्हा काश्मिरी राग आळवला. रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी झाली. दुसरीकडे मात्र पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर विभाजन अपूर्ण अजेंडा असल्याचा दावा करून काश्मिरातील जनतेच्या लढ्यात पाकिस्तान त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान दरवर्षी काश्मीर दिन साजरा करते. नवाझ यांनी फाळणीचा उल्लेख करून काश्मीर हा भारत-पाकिस्तान फाळणीतील अपूर्ण अजेंडा आहे, असे म्हटले आहे. काश्मीर समस्येची सोडवणूक केवळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाद्वारे शक्य आहे. भारताने काश्मीरमध्ये मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याचा आरोपही शरीफ यांनी केला. त्यासाठी जनमत चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराने काश्मीरवरील एक व्हिडिआे व गाणे जारी केले. हे गीत पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) सोशल मीडियावर जारी केले आहे.  दहशतवादी हाफिज सईदनेदेखील नवीन संघटनेच्या माध्यमातून काश्मिरी राग आळवला आहे.
 
अनेक आठवड्यांपासून विरोध
पाकव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. पीआेकेमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून पाकिस्तानला विरोध केला जात आहे. पाकिस्तान या प्रदेशात मनमानी करते. स्थानिक प्रशासनाच्या निर्णयात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सरळ-सरळ हस्तक्षेप असतो. विरोध करणाऱ्यांवर अन्याय केला जातो. 
 
शरीफांच्या उलट्या बोंबा
जम्मू-काश्मीरसह सीमेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या देशाचे पंतप्रधान शरीफ यांनी भारताला हिंसाचारासाठी जबाबदार धरले आहे. काश्मीरचा प्रश्न गेल्या ७० वर्षांपासून अनिर्णीत आहे. त्या शिवाय भारतीय सैन्य प्रदेशात सामान्य नागरिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हिंसाचार, रक्तपात घडवत आहे, असे शरीफ म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...