आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये शिकवणार गांधी, स्वातंत्र्य संग्राम; हे विषय शिकवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ऑक्सफर्ड विद्यापीठाने आता इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी नवे सक्तीचे विषय लागू केले आहेत. यामध्ये भारतीय, आशियाई व मध्यपूर्वेच्या इतिहासाचा समावेश आहे. शिकवल्या जाणाऱ्या मुख्य प्रकरणांत भारतीय स्वातंत्र्यलढा, १९६० च्या दशकातील नागरी 
हक्क चळवळ, महात्मा गांधी व मार्टिन ल्युथर किंग हे आहेत. ब्रिटिश विद्यापीठांमध्ये गोऱ्यांचा इतिहास किती दिवस शिकणार, जगात अन्य देशात काय झाले हे कधी शिकवणार, अशी मागणी विद्यार्थी अनेक वर्षांपासून करत होते. त्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडले आहे.

सध्याही ब्रिटिश इतिहासाचे दोन अनिवार्य विषय असतील. पदवी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षीच्या अभ्यासक्रमात येत्या सत्रापासून आणखी एक पेपर घ्यावा लागेल. हा विषय ब्रिटिश इतिहास किंवा युरोपीय इतिहासाशी संबंधित नाही. अभ्यासक्रमात गोऱ्यांचा प्रभाव असलेल्या विषयाचाच समावेश का, अशी विचारणा विद्यार्थी अनेक वर्षांपासून करत होते. या विद्यार्थ्यांना वसाहतवादाचा इतिहासही शिकण्याची इच्छा होती. अभ्यासक्रमात वसाहतवाद कशाला, अशी त्यांची मागणी होती. मार्टिन कॉनवे म्हणाले, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर इतिहासात विविधता आणली जात आहे. ब्रिटनचे अन्य विद्यापीठही याच मार्गाने जातील. लीड्स विद्यापीठ ब्लॅक ब्रिटिश हिस्ट्रीवर मॉड्यूल तयार करत आहे. केंब्रिज विद्यापीठातील प्रा. सर रिचर्ड इव्हान्स म्हणाले, इतिहास शिकवण्याची पद्धती बदलत आहोत.
 
हे विषय शिकवणार
- भारतीय स्वातंत्र्य चळवळ
- १९६० च्या दशकातील नागरी हक्क चळवळ
- महात्मा गांधी 
- मार्टिन ल्युथर किंग
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...