आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान घेऊन मालकाच्या मागे मागे चालणारा ‘लगेज रोबोट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्टन- छायाचित्रात दिसत असलेली निळ्या रंगाची गोलाकार बॅग म्हणजे खास प्रकारचे रोबोट लगेज आहे. गीता नामक हा रोबोट मालकाच्या मागे -मागे चालतो. त्यामुळे मालकाला हातात घेऊन चालण्याची गरज पडणार नाही. शिवाय ते सांभाळण्यासाठी अतिरिक्त जागेची गरजही भासणार नाही. २६ इंच लांबीचा हा रोबोट ताशी ३५ किलोमीटरच्या वेगाने चालू शकतो. पियाजियो या इटलीच्या दुचाकी उत्पादक कंपनीच्या ‘फास्ट फॉरवर्ड आरअँडडी लॅब’ या स्टार्टअपने याची निर्मिती केली आहे. 

१८ किलोपर्यंत सामान ठेवता येते
बॅटरीवरील हा रोबोट एकदा चार्ज केल्यानंतर ८ तास काम करतो. मार्गात येणाऱ्या कोणत्याही वस्तूला तो धडक देत नाही. कारण यात ४ कॅमेरे, सेन्सर आणि अल्ट्रासॉनिक रेंज फायंडर बसवले आहेत. लॉक सिस्टिमही फिंगरप्रिंट आधारित आहे.
बातम्या आणखी आहेत...