आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती उपचारातून इसाया ठणठणीत, ३५ डॉक्टरांनी टेकले होते हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्जिया- पोटच्या गोळ्याला होणाऱ्या वेदना पाहणे कोणत्याही आईसाठी असहाय करणारी गोष्ट असते. त्याच्या वेदना दूर करण्यासाठी ती खूप प्रयत्न करते; परंतु त्याला वेदनेतून मुक्ती मिळावी म्हणून त्याच्या मृत्यूसाठी निर्वाणीची प्रार्थना करावी लागते, तेव्हा त्या मातेचे दु:ख किती अपार असेल, हे सहजपणे लक्षात येते. जॉर्जियातील स्टेफनी स्मिथ (३५) यांचा मुलगा इसाया यास असाच वेदनादायी आजार होता.

इसायाची त्वचा लाल होऊन त्याला मरणांतिक वेदना व्हायच्या. तो दिवसभर त्या वेदनांनी विव्हळत असे. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी इसायाला एक्झिमा (इसब) असल्याचे निदान केले होते. स्टेफनी यांना मात्र ती औषधीची रिअॅक्शन असल्याचे वाटत होते. तीन महिन्यांचा असल्यापासून त्याला हा त्रास होत होता. डॉक्टरांनी दिलेल्या एक्झिमाच्या गोळ्यांनी त्याला काही दिवस आराम वाटायचा; परंतु एखाद्या आठवड्यानंतर त्याचा त्रास पुन्हा उफाळून यायचा. इसायाला अखेर रुग्णालयात दाखल करावे लागले. तेथे त्याला स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले. पाच दिवसांत तो बरा झाला; परंतु दोन दिवसांत पुन्हा तो पूर्वीसारखाच झाला. त्याला आतापर्यंत पाच वर्षांत ३५ डॉक्टरांना दाखवण्यात आले. त्याला केवळ कोमट पाण्याने आराम पडायचा. त्यामुळे स्टेफनी त्याला तासन््तास कोमट पाण्याने स्नान घालत. टॉवेलने पुसणे बंद केले. नरम आणि थंड कपडे घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्टेफनी व बाळाचे वडील निल्सन यांनी त्यावरील उपचाराचा इंटरनेटवर धांडोळा घेण्यास सुरुवात केली. अखेर त्यांचा शोध संपला. एक दिवस स्टेफनी यांनी घरगुती उपचार सुरू केले. त्यांनी होमिओपॅथिक बाम तयार केला. त्यात मेण, तेल, लेमनग्रास आणि झिंकचे मिश्रण होते. हा बाम इसायाच्या त्वचेच्या काही भागावर लावण्यात आला.