आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैंदर्य स्पर्धेत माॅडेल्सनी मांडली महिलांवरील हिंसाचाराबाबतची दाहक अाकडेवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिमा- साैंदर्य स्पर्धेसारख्या माेठ्या व्यासपीठाचा मिस पेरू स्पर्धेच्या स्पर्धकांनी अनाेखा वापर केला. या व्यासपीठावरून त्यांनी जगभरात महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचार-हिंसेविरुद्ध एकजूट करत संदेश दिला. या स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या एका माॅडेल्सने परीक्षकांसमाेर अापल्या शरीराची उंची, लांबी अादी माहिती सादर करण्याएेवजी महिला हिंसेची अाकडेवारी मांडली. ते पाहून सर्व माॅडेल्सनी एकापाठाेपाठ अाकडे मांडणे सुरू केले. हा प्रकार पाहून अायाेजक व परीक्षक सुरुवातीला हैराण झाले; परंतु शेवटी त्यांनीदेखील स्पर्धकांच्या या पुढाकाराचे काैतुक केले. 
पेरूची राजधानी लिमामध्ये मिस पेरू साैंदर्य स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यात २३ माॅडेल्स सहभागी हाेणार हाेत्या. स्पर्धेच्या एका फेरीदरम्यान त्यांना परीक्षकांसमाेर रॅम्पवाॅक करत येऊन अापली शारीरिक माहिती द्यायची हाेती. मात्र, या वेळी सर्व माॅडेल्स रॅम्पवाॅक करत पुढे अाल्या व त्यांनी महिला हिंसेची अाकडेवारी मांडणे सुरू केले. प्रथम एक माॅडेल रॅम्पवाॅक करत अाली. तिने स्वत:चे नाव कॅमिला कॅनिबाेला सांगितले व म्हणाली, माझे मेझरमेंट अाहे की, माझ्या देशात मागील नऊ वर्षांत २ हजार २०२ स्त्री-भ्रूणहत्या झाल्या अाहेत. याच प्रकारे इतर माॅडेल्सनीही एकापाठाेपाठ समाेर येत स्वत:च्या नावासह महिला हिंसा, छेडछाड व भेदभावाशी संबंधित अाकडेवारी सादर केली. 

पेरूमध्ये दर १० मिनिटाला एका महिलेची लैंगिकतेबाबत छेड काढली जाते. तसेच शाळांत शिकणाऱ्या २५ % मुलींना याचे शिकार व्हावे लागते, तर विद्यापीठांत शिकणाऱ्या ६५ % तरुणी अशा छेडखानीच्या व ७० % महिला रस्त्यावरील छेडखानीच्या शिकार झाल्या अाहेत, असेही या माॅडेल्सनी सांगितले.

या स्पर्धेचे टीव्हीवर लाइव्ह प्रसारण केले जात हाेते. माॅडेल्सच्या उत्तरांनी परीक्षक व अायाेजक हैराण झाले. मात्र, जसजशा एकानंतर एक सर्व माॅडेल्स पुढे अाल्या तसे उपस्थित प्रेक्षकांसह परीक्षक व अायाेजकांनीही त्यांचे काैतुक करणे सुरू केले. याबाबत माहिती देताना स्पर्धेच्या अायाेजक जेसिका न्यूटन यांनी सांगितले की, पुढाकार घेण्याचा हा एक चांगला प्रयत्न हाेता. माॅडेल्सनी महिला हिंसेविरुद्ध अावाज उठवण्यासाठी प्रेरित केले. तसेच त्या एकट्या नाहीत; जगभरातील महिला त्यांच्यासाेबत अाहेत, हे त्यांना माहीत व्हावे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या माॅडेल्सपैकी ५ अशा हाेत्या, ज्या कधी ना कधी छेडखानीच्या शिकार बनल्या हाेत्या.
ही स्पर्धा राेमिना लाेजानाे हिने जिंकली. या वेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना राेमिना म्हणाली की, छेडखानीच्या शिकार बनलेल्या महिलांना निर्भयपणे अापले मत मांडता यावे यासाठी मला एक नेटवर्क तयार करायला अावडेल. दरम्यान, दक्षिण अमेरिकेत महिला हिंसेबाबत पेरू दुसऱ्या क्रमांकावर अाहे. पेरूमध्ये मागील सहा वर्षांत लैंगिक भेदभावातून ८०० महिलांची हत्या झाल्याची माहिती याबाबतची अाकडेवारी जाहीर करताना पेरूतील सरकारने दिली अाहे.
बातम्या आणखी आहेत...