आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने जगासमोर आणले डोंगफेंग-16 क्षेपणास्त्र, 1000 किमीपर्यंत करू शकते अण्वस्त्रांचा मारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
बीजिंग - दहा चाकांच्या गाड्यांवर ठेवलेल्या डोंगफेंग-१६ या विशाल क्षेपणास्त्र दाखवून चीनने आपल्या ताकदीची जाणीव जगाला करून दिली. या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे चीन १००० किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रांचा मारा करू शकते. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात भारत, जपान, तैवान आणि अमेरिका हे देश येतात.  

चीनने बीजिंगमध्ये २०१५ मध्ये पहिल्यांदा हे क्षेपणास्त्र जगासमोर आणले होते, पण आता त्या देशाने विशेष रॉकेट फोर्स तुकडी तयार केली आहे. ही क्षेपणास्त्रे जपानच्या ओकिनावा शहरापर्यंत मारा करू शकतात. तेथे अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत.  

वसंत महोत्सव सुटीदरम्यान हे संचलन काढण्यात आले. त्यावेळी या क्षेपणास्त्रांचे नियंत्रण कसे केले जाते, रासायनिक, जैविक आणि पारंपरिक शस्त्रास्त्रे कशी लोड केली जातात याची माहिती देण्यात आली. या संचलनात दोन प्रकारची डीएफ-१६ क्षेपणास्त्रे दाखवण्यात आली. पण त्यांची तांत्रिक माहिती कधीही जाहीर करण्यात आलेली नाही.  अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यानंतर चीनने आपली लष्करी ताकद मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी निवडणूक मोहिमेदरम्यानच चीनच्या विरोधात मोर्चा उघडला होता.  
 
बातम्या आणखी आहेत...