आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूडीजवर अमेरिकेत 5800 कोटींचा दंड, मूडीज ही जगातील सर्वात मोठी संस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगभरात २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीदरम्यान गुणांकन संस्था मूडीजने जाहीर केलेल्या आकडेवारीत घोळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात कंपनी सुमारे ५८०० कोटी रुपयांचा (८६.४ कोटी डॉलर) दंड देण्यास तयार झाली आहे. या प्रकरणात गुणांकन संस्थेने धोकादायक असलेल्या मॉर्टगेज इन्व्हेस्टमेंटचे गुणांकन वाढवून सांगितले होते. कंपनीवरील हा आरोप सिद्ध झाला आहे.   

येथील सरकारी तपास विभागाच्या वतीने या प्रकरणात सेटलमेंट करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मूडीजच्या वतीने देण्यात येणारी ४३.७५ कोटी डॉलरची रक्कम सरकारी तपास यंत्रणा तसेच ४२.६३ कोटी डॉलर २१ राज्यांना देण्यात येणार आहे. मूडीजसह इतर दोन मोठ्या गुणांकन संस्था स्टँडर्ड अँड पुअर्स तसेच फिचवरदेखील जगभरातील २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात चुकीची आकडेवारी जाहीर करण्याचा आरोप लागला होता. त्यानंतर या दोन्ही संस्थांवरदेखील लोकांनी टीका केली होती.  

मूडीज ही जगभरातील सर्वात मोठी गुणांकन संस्था असून या प्रकरणात आपण नियमांचे पालन केले नसल्याचे संस्थेने मान्य केले आहे. काही आर्थिक उत्पादनांबाबत माहिती देताना नियमांचे पालन केलेले नसून त्यांच्या गुणांकनात इतर उत्पादनांची तुलना सर्वसामान्य व्यक्तींना सांगण्यात आली नसल्याचेही संस्थेने मान्य केले आहे. या प्रकरणात मूडीजने स्वत:च्याच नियमांप्रमाणे काम केले नसून सर्वात मोठ्या मंदीच्या काळात पारदर्शकतेचे प्रदर्शन करण्यात संस्था अपयशी ठरली असल्याचे ‘प्रिंसिपल डिप्टी असोसिएट अॅटर्नी जनरल’ बिल बायर यांनी म्हटले आहे.   

या संदर्भात आपण आपल्या गुणांकनाच्या प्रणालीमध्ये काही बदल करणार असल्याचे मूडीजने स्पष्ट केले आहे. या प्रणालीत जाहीर करण्यात येणाऱ्या गुणांकनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रणाली तयार करण्यात येणार असल्याचेही संस्थेने सांगितले आहे. या प्रकरणामुळे संस्थेवर मात्र, मोठ्या प्रमाणात टिका झाली आहे.