आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी ग्राहकांना रुचली नाही ‘मड लूक’ जीन्स, परिधान केल्यास खराब होण्याची चिंता नसते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फॅशनच्या युगात आतापर्यंत आपण फेडेड जीन्सपासून ते फाटलेल्या किंवा छिद्रे असलेल्या जीन्स पाहिल्या आहेत. मात्र, अमेरिकेतील लक्झरी डिपार्टमेंटल स्टोअर चेन चालवणारी कंपनी नॉर्डस्ट्रॉम इंकने दिसायला अत्यंत मळलेली दिसणारी जीन्स बाजारात आणली आहे.   

या जीन्सवर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती लागलेली असल्याप्रमाणे या जीन्सला लूक देण्यात आला आहे. नॉर्डस्ट्रॉमने अशा जीन्सची किंमत ४२५ डॉलर म्हणजेच सुमारे २७,३०० रुपये ठेवली आहे. ज्या श्रीमंत व्यक्ती नेहमीच स्वच्छ कपडे घालतात त्यांच्यासाठी तसेच ज्यांना या राहणीमानात बदल करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही जीन्स तयार करण्यात आली असल्याचा कंपनीचा दावा आहे. जर त्यांनी ही जिन्स परिधान केली तर त्यांना कपडे खराब होण्याची भीती राहणार नाही.   
 
अमेरिकी लोकांना मात्र कंपनीचा हा दावा रुचला नाही. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर कंपनीच्या विरोधात राग व्यक्त केला. त्यांनी फेसबुक-टि्वटवर या जीन्सचा फोटो पोस्ट करून विविध प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. लोकांनी या जीन्स वर “फेक जीन्स’ असल्याचे मत व्यक्त केले. कंपनी इतकी मळलेल्या दिसणाऱ्या जीन्सची इतकी जास्त किंमत कशी ठेवू शकते हेच समजत नसल्याचे लोकांचे म्हणणे होते. जर आम्हाला “मड लूक’ची जीन्स वापरायची असेल तर आम्ही एवढे जास्त पैसे का खर्च करावे? अशी जीन्स तर घरीदेखील बनवता येईल. जर सामान्य जीन्स घालून वर्कशॉप किंवा बगिच्यात काम केले तरी काही कालावधीनंतर त्यांना खरीखुरी मड किंवा ग्रीस लूक असणारी जीन्स मिळू शकते. त्यामुळे आम्हाला “फेक जीन्स’ची आवश्यकता नाही.  डेव शॅफर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “नॉर्डस्ट्रॉमच्या मड जीन्सची खरेदी करू नका. तुमची कोणतीही जीन्स माझ्याकडे पाठवून द्या. मी २०० डॉलर (सुमारे १२,८०० रुपये) मध्ये तिला एकदम “मड लूक’प्रमाणे जीन्स बनवून पाठवून देईन.’  
 
डिस्कव्हरी वाहिनीचा कार्यक्रम “डर्टी जॉब्ज’चे निवेदक माइक रो यांनी या प्रकरणावर टीका करत म्हटले की, “एखाद्या व्यक्तीने ही जीन्स घालून धूळ-माती किंवा ग्रीस आदी लागल्याने ती खराब झाली अाहे, असे या जीन्सला पाहून वाटते. मात्र, जे व्यक्ती श्रीमंत असून कपडे खराब हाेतील असे कोणतेच काम करत नाहीत, अशा लोकांसाठी ही जीन्स तयार करण्यात आली आहे.’  दुसरीकडे विरोध वाढत असल्याचे पाहून कंपनीने आपल्या वेबसाइटवरून या जीन्सबाबतचे सर्व रिव्ह्यू काढून टाकले आहेत. नॉर्डस्ट्रॉमच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार 
दिला आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...