आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंच, डिनर सोबत; मात्र मोदी-आेबामा चर्चा नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंटल्या- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सौदी राजे सलमान अल सऊद तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अॅर्दोगान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. परंतु लंच, डिनर सोबत करूनही त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होऊ शकली नाही.

आेबामांसोबत मोदी सुमारे ४५ मिनिटे होते. उभय नेत्यांनी लंच, डिनर एकत्रच घेतले. परंतु चर्चा होऊ शकली नाही. मोदींनी सुरुवातीला जी-२० देशांचे यजमान अॅर्दोगान यांची भेट घेतली. दहशतवाद्यांच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना करण्यावर उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य करण्याचा प्रस्तावही मोदींनी त्यांच्यासमोर ठेवला. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, पंतप्रधानांनी चार निर्यात नियंत्रक व्यवस्थांचे सदस्यत्व मिळावे, अशी विनंतीही केली.
स्पेन पीएमशी चर्चा
मोदी यांनी स्पेनचे पंतप्रधान मारियानो रेजॉय यांच्याश चर्चा केली. यात दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे, आधुनिकीकरण, संरक्षण उत्पादन, अपारंपरिक ऊर्जा, सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात स्पेन-भारत सहकार्याचे नवे पर्व सुरू होईल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.