आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना आईच्या गर्भासारखी जाणीव देईल हे स्मार्ट बेड, झोका देईल, अंगाईही गाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्टन - संशोधकांनी असे बेड तयार केले आहे, जे मुलांना अगदी आईच्या गर्भासारखी जाणीव देईल. हे खास बेड अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियंत्यांनी बालरोग तज्ज्ञ हार्वे कार्प आणि स्वित्झर्लंडच्या वेस बेहर यांच्यासोबत बनवले आहे.

मुलांना शांत झोपवण्याच्या प्रयत्नात बहुधा आई-वडिलांची झोप उडते, पण या संशोधनाने ती अडचण दूर होऊ शकते. मुलांना आरामदायक झोप मिळेलच शिवाय पालकही निश्चिंत राहतील. संशोधकांच्या दाव्यानुसार अशा प्रकारचे हे स्मार्ट बेड मुलांसाठी सर्वात सुरक्षित असेल. हे बेड मुलांना आईच्या गर्भासारखी जाणीव देते. त्याला स्नू असे नाव दिले आहे. ते मुलांना हळूहळू झोका देऊन झोपवते. मूल रडायला लागले की त्यात लावलेल्या मायक्रोफोनला त्याची जाणीव होते. त्यानंतर मुलाला झोपवण्यासाठी बेड गोड आवाजही काढते. त्याची विविध साउंड सेटिंग्ज आहेत. म्हणजे बेड मुलांना हाय पीच ऐकवून लक्ष वळवेल, तर लो पीचने त्यांना आरामदायी झोपही देईल. संशोधकांच्या मते, मूल आरामात झोपले तर आई-वडिलांनाही आराम मिळतो. त्यामुळे या बेडमध्ये मुलांची प्रत्येक गरज लक्षात घेतली आहे. त्याशिवाय हे बेड नवजातांना व्यवस्थित झोपेची सवयही लावते.

संशोधकांच्या मते, पहिल्यांदाच पालक झालेल्या लोकांची गरज लक्षात घेऊन ते बनवण्यात आले आहे. कारण मुलांना कसे सांभाळावे याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे हे बेड त्यांना उपयुक्त ठरेल.
बातम्या आणखी आहेत...